
लोहारा/प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी, धाराशिव ओ.बी. सी.मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष पदी ॲड. भालचंद्र औसरे, जिल्हा सरचिटणीस ॲड.तानाजी वाघमारे आणि तालुका सोशल मीडिया संयोजक म्हणून बापुसाहेब कोळी, बाळासाहेब गिरी यांची निवड करण्यात आली. या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा भाजपा नेते माजी आ.सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते भाजपा संपर्क कार्यालय, परंडा येथे सत्कार करुन शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष ॲड.गणेश खरसडे, जिल्हा उपाध्यक्ष सुखदेव टोंपे, जिल्हा सरचिटणीस विकास कुलकर्णी, प्र.कार्यकारिणी सदस्य ॲड.झहीर चौधरी, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अरविंद रगडे, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष ॲड.संतोष सुर्यवंशी, जिल्हा चिटणीस सुजित परदेशी, ता. उपाध्यक्ष बाबासाहेब जाधव, शिवाजी पाटील, ता.सरचिटणीस तानाजी पाटील, धनाजी गायकवाड, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष तुकाराम हजारे, साहेबराव पाडुळे, जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष सारंग घोगरे, श्रीमंत शेळके, जिल्हा युवा मोर्चा सरचिटणीस अनिल पाटील, चिटणीस रामकृष्ण घोडके, मिलिंद शिंदे, धनंजय काळे, मनोहर पवार, सुरज काळे, गौरव पाटील, आकाश मदने, अमर ठाकूर तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.