ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय
शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त धाराशिव येथे 25 बालकांना बेबी किट वाटप

शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त धाराशिव येथे 25 बालकांना बेबी किट वाटप
धाराशिव /न्यूज सिक्सर
शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त धाराशिव शहरातील देशपांडे स्टॅण्ड येथील शिवसेना, युवासेना संपर्क कार्यालयाच्या वतीने बेबी किटचे वाटप करण्यात आले.
शिवसेनेचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख शंकरतात्या बोरकर, शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार कैलासदादा पाटील, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा माजी नगराध्यक्ष नंदूभैया राजे निंबाळकर, माजी नगराध्यक्ष दत्ता बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली
धाराशिव शहरातील शिवसेना युवासेना संपर्क कार्यालय देशपांडे स्टॅण्ड धाराशिव यांच्या वतीने 20 टक्के राजकारण व 80 टक्के समाजकारण शिवसेनेच्या धोरणाप्रमाणे आज शिवसेना पक्षाच्या 57 व्या वर्धापन दिनानिमित्त युवकांनी गरजु कुटुंबांतील धाराशिव शहरातील एक वर्षाच्या आतील 25 बालकांना बेबी किटचे वाटप रवी कोरे अळणीकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी युवानेते दिनेश बंडगर, राज निकम, सुधीर अलकुंटे, बालाजी झेंडे, शुभम ईटकर, बालाजी यमपुरे, संतोष यमपुरे, यांच्यासह शिवसैनिक युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.