न्यूज सिक्सर मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

चोरीच्या मालासह आरोपी ताब्यात उस्मानाबाद स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

चोरीच्या मालासह आरोपी ताब्यात

उस्मानाबाद स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

तुळजापूर /न्यूज सिक्सर
एस.टी. कॉलनी, तुळजापुर येथील राजू चंद्रशेखर धरने यांनी बांधकाम घेतलेल्या संभाजीनगर, तुळजापूर येथील गणेश लॉजच्या पाठीमागील बांधकामावरील अंदाजे 19,760 ₹ किंमतीचे लोखंडी सळईचे चार बंडल दि.25.12.2022 रोजी 18.00 ते दि 18.01.2023 रोजी 09.00 वा. दरम्यान अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले होते. तर कामठा, ता. तुळजापुर येथील- शमशोद्दीन जिलानी शेख यांनी तुळजापूर येथील- संजय कदम यांच्या घरामध्ये ठेवलेले अंदाजे 65,000 ₹ किंमतीचे प्लंबींगचे साहित्य ठेवले होते. दि.17.01.2023 रोजी 17.30 ते दि 18.01.2023 रोजी 09.30 वा. दरम्यान कदम यांच्या घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने तोडून नमूद साहित्य चोरुन नेले होते. अशा मजकुराच्या राजू धरने यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतग्रत तर शमशोद्दीन शेख यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457,380 अंतर्गत तुळजापूर पो.ठा. येथे स्वतंत्र 02 गुन्हे नोंदवले आहेत.

            गुन्हा तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुन्ह्याच्या कार्यपध्दीच्या व मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ‍तुळजापूर येथील- शिवाजी सहदेव गायकवाड यासह एक विधी संघर्षगृस्थ बालक अशा दोघांना दि. 19.01.2023 रोजी तुळजापूर परिसरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपुस केली असता त्यांनी प्रथमत: पोलीसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. पथकाने त्यांस अधिक विश्वासात घेउन विचारपुस करुन त्यांच्या ताब्यातून नमूद दोन्ही गुन्ह्यांतील गेला माल हस्तगत केला. तसेच त्यांच्यातील विधी संघर्षग्रस्त बालकास बाल सुधारगृहात पाठवण्याची तजबीज ठेवली आहे.

            सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांच्या आदेशावरुन स्था.गु.शा. चे पोनि- श्री. यशवंत जाधव, सपोनि- श्री. मनोज निलंगेकर, पोलीस अंमलदार- प्रकाश औताडे, जावेद काझी, अमोल निंबाळकर, अजित कवडे, यांच्या पथकाने केली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे