
लोहारा-प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी लोहारा तालुकाध्यक्ष किशोर साठे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्य पदी निवड झाली आहे.
लोहारा तालुक्यातील माकणी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष किशोर साठे यांची प्रदेश कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे यांच्या हस्ते त्यांना मुंबई येथे नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार,जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे,पदवीधर विभागाचे प्रदेश कार्याध्यक्ष नितीन बागल,जिल्हा कार्याध्यक्ष प्रविण यादव,नवनाथ जगताप, जयंत देशमुख,महेश नलावडे,लोहारा तालुकाध्यक्ष सुनील साळुंके,शमशोद्दीन जमादार,रणजित गायकवाड,भिमा स्वामी आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.