
लोहारा/प्रतिनिधी
रमजान ईद व भाजपा तालुका सरचिटणीस तथा जिल्हा मराठी पत्रकार संघ तालुका अध्यक्ष इकबाल मुल्ला यांच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त लोहारा शहरातील मिलाप मित्र मंडळाच्या वतीने सामाजिक भावना जपत दि.२८ मार्च रोजी तालुक्यातील मार्डी येथील प्राथमिक आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना अल्पोपहार व फळांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक बाळासाहेब भोसले होते तर प्रमुख म्हणुन मिलाप मित्र मंडळाचे जलाल इकबाल मुल्ला,सुरज शिंदे,अदित्य पवार,तोहिद ईनामदार, संतोष मुळे सर, नेताजी सोमवंशी सर, श्रीमती सुनिता भोरे मॅडम,लशिवानंद मुळे, रूपाली माटे,मारुती देवकर,अनिल सोमवंशी अदि उपस्थित होते. यावेळी सामाजिक उपक्रम राबविल्याने मिलाप मित्र मंडाळाच्या पदाधिकार्यांचा शाळेच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन अनिल सोमवंशी यांनी केले तर आभार संतोष मुळे सर यांनी मानले. यावेळी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.