
लोहारा -प्रतिनिधी
लोहारा तालुक्यातील मार्डी येथे हजरत खाजा जैनोदीन (जिंदावली) दर्गा देवस्थानच्या ३९९ व्या उर्स यात्रा निमित्त दि.६ फेब्रुवारी रोजी मोठी यात्रा भरली होती.
हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेली या यात्रेला महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगाणा राज्यातील अनेक भाविक दर्शनासाठी येतात.आलेल्या भाविकांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी लोहारा येथील अल-गाजी महेदवीया सोशल ट्रस्ट च्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दर्गा परिसरात थंड पाणी वाटप करण्यात आले.
यावेळी अल-गाजी महेदवीया सोशल ट्रस्टचे युनुस मोमीन,गौस मोमीन, सलीम मोमीन, खुदमीर मोमीन, महंमदी मोमीन, सादिक मोमीन, नसीम मोमीन, मोहसीन मोमीन, अमजत मोमीन, हाजीलाल मोमीन, हसन मोमीन, पाशा मोमीन, रफिक मोमीन, आसिफ मोमीन, बाबा मोमीन, जावेद मोमीन, महेबूब मोमीन आदी सदस्य उपस्थित होते.