
लोहारा-प्रतिनिधी
लोक प्रतिनिधी नाही तर सेवक म्हणून विकास कामासाठी लागणारा निधी शासन स्तरावरून मंजूर करून विकास कामे आम्ही केली आहे.कमी बोलून जास्त विकास कामे करणे फक्त आणि फक्त समाजकारण याकडे आमचे ध्येय आहे. पाणी प्रश्न बाबत अनेक वरील स्तरावर अडचणी आल्या त्यावर उपाय व मात करून पाणी पुरवठा मंजुरी मिळाली.तीन टर्म मध्ये जे काय कामे केली आहे ती सर्व जनतेला माहीत आहे. शहराला लागणाऱ्या सर्व मूलभूत सुविधा देण्याचा पुर्ण प्रयत्न केला असल्याचे मत आ.ज्ञानराज चौगुले यांनी लोहारा शहरासाठी समांतर कायमस्वरूपी निम्न तेरणा प्रकल्प च्या माकणी धरणातून पाणी पुरवठा योजनेच्या कामाचा भूमिपूजन सोहळा वेळी दि.११ रोजी व्यक्त केले.
लोहारा वासियाचा जिव्हाळ्याचा पाणी प्रश्न अनेक अडचणी ला मात करून आ.ज्ञानराज चौगुले यांच्या प्रयत्नातुन ३४ कोटी रुपये निधी उपलब्ध करून पाणी पुरवठा योजनेचा शुभारंभ पार पडला.
विकास कामावरून जनता आ.ज्ञानराज चौगुले यांना चौत्यांदा विधानसभेत पाठवणार असल्याचे मत मा खा रवींद्र गायकवाड यांनी अध्यकक्षीय भाषणात व्यक्त केले.
मा खा. रवींद्र गायकवाड,युवासेना मराठवाडा निरीक्षक किरण गायकवाड,जिल्हा प्रमुख मोहन पनुरे, नगराध्यक्ष वैशाली खराडे,उपनगराध्यक्ष आयुब शेख,शिवसेना तालुकाप्रमुख जगन्नाथ पाटील,भीमराव वरनाले,नागण्णा वकील,राजेंद्र माळी,सर्व नगरसेवक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते