जिल्हा पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी कदम तर सचिवपदी जाधव यांची निवड

जिल्हा पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी कदम तर सचिवपदी जाधव यांची निवड
उस्मानाबाद /न्यूज सिक्सर
उस्मानाबाद जिल्हा पत्रकार संघातर्फे पत्रकार दिनानिमित्त शुक्रवारी (दि.6) शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांचा गौरव सोहळा पार पडला. या कार्यक्रमात पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रसेन देशमुख यांनी जिल्हा पत्रकार संघाची उस्मानाबाद तालुका कार्यकारिणी जाहीर केली. यावेळी नुतन पदाधिकार्यांचा प्रमुख पाहुणे जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, सचिव भिमाशंकर वाघमारे, ज्येष्ठ पत्रकार कमलाकर कुलकर्णी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या कार्यकारिणीत तालुकाध्यक्षपदी दैनिक एकमतचे जिल्हा प्रतिनिधी मच्छिंद्र कदम तर सचिव म्हणून दैनिक प्रजापत्रचे जिल्हा प्रतिनिधी राजेंद्रकुमार जाधव यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्ष हरि खोटे (तेर), सहसचिव अजहर शेख, मुख्य संघटक सुधीर पवार (लोकपत्र), कोषाध्यक्ष शिवराजसिंह गव्हाणे तर सदस्य म्हणून संजय शिंदे (ढोकी), निसार जमिल पटेल (उस्मानाबाद), पाडूरंग गोवर्धन पवार (उस्मानाबाद), अमर शेख (तडवळा), औदुंबर पडवळ (उपळा), सुमेध वाघमारे (तेर), अर्जुन सुतार (येडशी), शितलकुमार शिंदे (बेंबळी) यांची निवड करण्यात आली. निवडीनंतर नुतन सर्व पदाधिकार्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाठक नारीकर, माजी अध्यक्ष महेश पोतदार, रवींद्र केसकर, उपाध्यक्ष बालाजी निरफळ, कोषाध्यक्ष जी.बी.राजपुत, विकास सुर्डी, बाबुराव चव्हाण, सयाजी शेळके, राकेश कुलकर्णी, अमोल गाडे, सुभाष कदम, शिला उंबरे, आकाश नरोटे, प्रा. अभिमान हंगरकर, शितलकुमार धोंगडे, दौलत निपाणीकर, शाम लोमटे, बाळासाहेब माने, सतिश मातने, आय्युब मोमीन, मनोज मोरे, उमाकांत भुसारे, लहू पडवळ, प्रमोद राऊत, बाळू खाडे आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.