नळदुर्ग महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. उध्दव भाले यांची जागतिक शास्त्रज्ञाच्या यादीतील नामांकन प्राप्त : सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव

नळदुर्ग महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. उध्दव भाले यांची जागतिक शास्त्रज्ञाच्या यादीतील नामांकन प्राप्त : सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव
वागदरी /न्यूज सिक्सर
फुले-शाहू-आंबेडकर चळवळीतील बुद्धीजीवी कार्यकर्ते तथा कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय नळदुर्ग ता.तुळजापूर येथील वनस्पतीशास्त्र विषयाचे प्राध्यापक डॉ. उद्धव भाले यांना 2023 च्या शेती आणि वनस्पतीशास्त्र विषयाच्या जागतिक शास्त्रज्ञाच्या यादीतील नामांकन प्राप्त झाले आहे.
डॉ. उद्धव भाले हे मागील वीस वर्षापासून नळदुर्ग महाविद्यालय मध्ये कार्यरत असून त्यांच्या सततच्या शेतीविषयक प्रयोगाचे संशोधन त्यामध्ये विविध कृषीरसायने, बुरशीनाशके व जैविक बुरशीनाशकाच्या माध्यमातून वनस्पतीवर पडलेल्या रोगाची निर्मूलन करून उत्पादन क्षमता कशा प्रकारचे वाढवता येईल अशा अनुसंगाचे ते सातत्याने संशोधन करीत आहेत. आतापर्यंत त्यांनी भारतीय व जागतिक पातळीवर एकूण 150 पेक्षा जास्त संशोधन विषयक शोधनिबंध हे विविध जागतीक पातळीवरील संशोधन पत्रिकेतून प्रकाशित केलेले असल्यामुळे त्यांचे प्रकाशित झालेले संशोधन जागतिक पातळीवरील संशोधकाने वापर करून शेती संशोधनात भर टाकली आहे. त्याचबरोबर .डॉ. भाले यांनी आतापर्यंत महाविद्यालयात 12 संशोधक (P.hd.)विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पूर्ण केले आहे व सध्या त्यांच्याकडे सात विद्यार्थी मार्गदर्शन घेत आहेत.त्याचबरोबर त्यांनी आतापर्यंत पदवी,पदवीतर व संशोधक विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार पुस्तकाचे लेखनही केलेली आहे तसेच त्यांनी विविध महत्वाचे शेती विषयक संशोधन प्रकल्पही पूर्ण केलेले आहेत. ते महाविद्यालयामध्ये अजून सुद्धा सातत्याने संशोधन व संशोधन विषयक लिखाण करीत आहेत त्यांच्या हया कौशल्यामूळेच त्यांच्याकडे नॅक मुलांकनासाठी संशोधनविषयकचा क्रायटेरिया- ३ दिलेला होता. त्या क्रायटेरियाला त्यानी पूर्ण न्याय देऊन ए ++ दर्जा चे मार्क्स मिळवून दिलेले आहे . त्यामुळेच महाविद्यालयाला बी ++ दर्जा मिळलेला आहे. हे वाखान्याजोगे आहे.अशा संपूर्ण संशोधन कामाची दखल जागतिक पातळीवर घेऊन त्यांचा जागतिक शास्त्रज्ञाच्या यादीत नामांकन मिळाले आहे.त्यामुळे बालाघाट शिक्षण संस्था आणि कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय नळदुर्गचे नाव जागतिक पातळीवर झळकले जात आहे हे नळदुर्ग करांसाठी अभिमानाची बाब आहे.
यामुळे बालाघाट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. मधुकरराव चव्हाण , सचिव मा.उल्हासदादा बोरगावकर , संस्थेचे संचालक,प्राचार्य व मित्रपरिवार चळवळीतील कार्यकर्ते अशा सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.