कर्णकर्कश वाद्य (डिजे)वाजवणाऱ्यावर उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल दंडात्मक कारवाई
गणेश खबोले

उस्मानाबाद / न्युज सिक्सर
उस्मानाबाद शहरातील खाँजा शम्शोधीन रहे संदल मिरवणुकीत दि. ०८.०२.२०२३ रोजी रात्री ११.३० वा. सुमारास विजय चौक उस्मानाबाद येथे मा. जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांचे जमावबंदीचे, गाणी म्हणणे वाह्य वाजविण्यास मनाई असताना देखील इसम नामे अक्षय बापू लावंड वय २७ रा. चंदननगर पुणे यांने त्याच्या ताव्यातील मालकोचे चारचाकी वाहन टाटा ९०९ एलपीडी या मध्ये विनापरवाना बेकायदेशीर रित्या मोठे मोठे स्पिकर संदल मिरवणुकीत वाद्य व गाणे वाजवले म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक चव्हाण पो.स्टे. उस्मानाबाद शहर यांनी दिलेल्या तक्रारीवरून पो.स्टे. उस्मानाबाद शहर येथे ०५/२०२३ म.पो. का. कायदा कलम ३८/१३६ अन्वये गुन्हा दाखल करुन मा. न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने ५०००/- आर्थिक दंड ठोठावला आहे.
मा. न्यायालयाच्या या कार्यवाही पुढे डोगे मालकाचे धाबे दणाणले आहेत.