कै.सुरज प्रदिप कांबळे यांच्या स्मरणार्थ पाणपोईचे उदघाटन

कै.सुरज प्रदिप कांबळे यांच्या स्मरणार्थ पाणपोईचे उदघाटन
तुळजापूर /न्यूज शिकस्त
कै. सुरज प्रदिप कांबळे यांच्या स्मरणार्थ सामाजीक कार्यकर्त्यां प्रज्ञाताई गायकवाड
यांच्या वतीने जुने एस टी बस स्टॅन्ड येथे पाणपोई सुरु करण्यात आली. या पाणपोईचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष गोकुळ (तात्या) शिंदे,सामाजिक कार्यकर्त्या प्रज्ञाताई गायकवाड,श्रीमती माजी नगराध्यक्षा संगिताताई कदम,सिंधूताई कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले.उन्हाळा सुरू होताच एस टी बसस्थानकातील परिसरात ये-जा करणाऱ्या प्रवास करणाऱ्या नागरीकांना व भाविक तसेच वाटसरूंना दरवर्षी कार्यकर्त्यां प्रज्ञाताई गायकवाड यांच्या वतीने थंडगार पाण्याची व्यवस्था करण्यात येते. पाणपोईच्या उद्घाटनप्रसंगी सामाजीक कार्यकर्ते दत्ता कांबळे, संपादक सोमनाथ बनसोडे,पत्रकार ज्ञानेश्वर गवळी,गणेश राजगुरु,बालाजी कांबळे, शंकर गायकवाड, जोतीराम पवार, श्रीमती चंद्रकला गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.