उस्मानाबाद पोलीस ठाणे आयोजीत सामाजिक सलोखा चषक.
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

उस्मानाबाद पोलीस ठाणे आयोजीत सामाजिक सलोखा चषक.
तुळजापूर : प्रतिनिधी
पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांचे सकंल्पनेतुन दि.१५ मे ते १७ मे पर्यंत उस्मानाबाद शहर पोलीस ठाणे येथे आयोजीत सामाजिक सलोखा चषक, उस्मानाबाद स्पर्धेचे आयोजन उस्मानाबाद जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या २ नंबर कवायत मैदानावरती करण्यात आले ओह.या मध्ये उस्मानाबाद शहरातील डॉक्टर, वकील, तसेच ग्रामीण भागातील असे एकुण १६ संघ सहभागी झाले आहेत.या मध्ये प्रथम क्रंमाक याणाऱ्यास प्रथम पारितोषीक ४१,०००/- व्दितीय पारितोषिक २१,०००/-, तृतीय पारितोषिक ११,०००/- असे आयोजन करण्यात आले आहे. सदर समारंभचे उदघाटन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचे हस्ते करण्यात आले.
सदर कार्यक्रमास पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, उस्मानाबाद शहर पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी उस्मान शेख, सपोनि . चव्हाण, भराटे, स्थानिक गुन्हे शाखेचे- सपोनि निलगेंकर, पोउपनि ओहोळ, संयोजक बालाजी काटकर, परम जाधवर, विजय कांबळे, महादेव शिंदे, सचिन स्वामी, शशिकांत जाधवर,डान्सिंग पंच सोन्या बापु भोसले, यांसह जिल्हा पोलीस दलातील अधिकारी- अंमलदार आदि उपस्थितीत होते.