न्यूज सिक्सर मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

महिला बचत गटाच्या रणरागिणी उपोषणाच्या मैदानात

गणेश खबोले

महिला बचत गटाच्या रणरागिणी उपोषणाच्या मैदानात

हदगाव / नांदेड (हिमांशू इंगोले)

हदगाव तालुक्यातील महिला बचत गटाच्या रणरागिणी ह्या विविध मागण्या संदर्भात तहसील कार्यालयाच्या आवरत आज रोजी दि. १० फेब्रुवारी पासून उपोषणास सुरुवात करण्यात आली तत्पूर्वी आचारसंहिता असल्याकारणाने प्रशासनाच्या विनंतीस मान देऊन काही दिवसांसाठी उपोषण मागे घेतले होते पण तहसील कार्यालय हदगाव यांनी इतक्या दिवसात त्यांच्या कोणत्याही मागण्या पूर्ण केले नाही. हे विशेष.

आकांक्षा कपिल वायवळ रा. हरडफ येथील रहिवासी असून ग्रामीण भागातील महिला बचत गटामार्फत प्रमुख मागण्या करण्यात आले होते की, संपूर्ण तालुक्यात महिला बचत गटांना बैठकीसाठी व साहित्यासाठी व्यवस्था करावी, तालुक्यातील
पूर्ण शाळेत सेमी इंग्लिशचे क्लासेस चालू करावे, वरिष्ठ अधिकारी हे शाळेवरचे शिक्षकांना मुख्यालयी बोलवतात त्यामुळे त्या गावातील विद्यार्थ्यांचे नुकसान होते अशा अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, स्वस्त धान्य दुकानदारांचे पूर्ण लेखाजोखा ग्रामपंचायत कार्यालयात जमा ठेवावे, शिधापत्रिकेवर अचानक नावे कमी होण्याचे प्रमान वाढले असून त्यांच्या विरोधात कारवाई व्हावी, सर्वात महत्त्वाचे म्हणजे ग्रामीण भागातील कर्मचाऱ्यांची हजेरीपट हे जिओ टॅगच्या माध्यमातून घेण्यात यावी जे कर्मचारी जिओ टॅगप्रमाणे हजेरी नाही देणार अशांवर कारवाई व्हावी अशा विविध मागण्यांसाठी महिला बचत गटाच्या महिला आमरण उपोषणास सुरुवात झाली असून हदगाव तहसील कार्यालय यांच्या मागण्यावर कोणता निर्णय घेते याकडे संबंध तालुक्याचे लक्ष लागून आहे. यावेळी हदगाव तालुक्याचे लोकनेते बाबुराव कदम कव्हळीकर, भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे नांदेड जिल्हा अध्यक्ष रामदास बाभुळकर, भीम टायगर सेनेचे संस्थापक अध्यक्ष दादासाहेब शेळके, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष दयानंद पाईकराव, शेतकरी संघटनेचे नेते प्रल्हाद पाटील हडसनकर यांनी यावेळी जाहीर पाठिंबा दर्शविला.

लोकनेते बाबुराव कदम कव्हळीकर यांनी हदगाव तहसील कार्यालयासमोर बसलेल्या उपोषणकर्त्या महिलांशी संवाद साधून मध्यस्थी केली व हदगाव तालुक्याचे उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील यांच्याशी भ्रमणधरणीवरून संपर्क करून उपोषण करते आणि त्या समस्या सोडवण्यासाठी तत्काळ दि.१५ तारखेपर्यंत पूर्ण कार्यालयीन अधीक्षक यांची बैठक लावून बचत गटाच्या महिलांच्या समस्या सोडवण्यासंदर्भात मध्ये चर्चा केल्यानंतर उपोषणकर्त्यांनी लेखी पत्र घेतल्यावर बाबुराव कदम कव्हळीकर यांनी मध्यस्थी करून उपोषण सोडण्यात आले

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे