न्यूज सिक्सर मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

लहुजी शक्ती सेना,मातंग समाजाच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजे – प्रा. विजय क्षिरसागर

पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

छत्रपती शिवाजी चौक धाराशिव येथे रास्ता रोको करीत आंदोलन 

लहुजी शक्ती सेना,मातंग समाजाच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजे – प्रा. विजय क्षिरसागर

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

छत्रपती शिवाजी चौक धाराशिव येथे रास्ता रोको करीत अनुसूचित जाती आरक्षणात वर्गीकरण झालेच पाहिजे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळालाच पाहिजे या दळभद्री गाढव सरकारचं करायचं काय खाली मुंडक वर पाय अशा घोषणा देत

आंदोलन करीत दि. ०४ डिसेंबर रोजी पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे आनंद नगर, धाराशिव यांना लहुजी शक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. विजय क्षिरसागर यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात घोषणा देत निवेदन देण्यात आले.

या निवेदनावर असे नमूद केले आहे की, लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू कसबे हे मातंग समाजाच्या विविध प्रश्नासाठी दि.१६/११/२०२३ पासुन पुणे ते नागपूर पद यात्रा करीत आहेत. मातंग समाजाच्या अनुसूचित जाती प्रवर्गात अ.ब.क.ड. वर्गीकरण करून उपेक्षित वंचित जातीला आरक्षण देण्यात यावे.

क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे व साहित्यरत्न डॉ. आण्णाभाऊ साठे यांचे राष्ट्रीय स्मारक व्हावे व डॉ. साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा

बार्टीच्या धरतीवर आर्टीची स्थापना करण्यात यावी.,पुणे गंजपेठेतील व्यायाम शाळेस राष्ट्रीय दर्जा देऊन राष्ट्रीय स्मारक घोषित करावे.धाराशिव येथील लहुजी चौक व साठे चौक सी सी टी व्हि बसविण्यात यावे साठे नगर, तुळजापूर नाका, धाराशिव येथील मातंग समाजाची घरजागा नावे करून घरकूल देण्यात यावे.

व इतर मागण्या करिता दि. ०४ डिसेंबर रोजी दुपारी १२.०० वा. छ. शिवाजी महाराज चौक येथे रस्ता रोको आंदोलन करुन विष्णू कसबे यांच्या पदयात्रेत त्यांचे हाल होऊन त्यांच्या पायाला – जखमा होऊन ईजा होत आहेत. तरीही हे झोपलेले सरकार या पदयात्रेकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष करीत मातंग समाजाच्या मागण्याकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष करत आहे.लवकरात लवकर मातंग समाजाच्या मागण्या मान्य करण्यात याव्यात अन्यथा या पेक्षाही अधिक तिव्र आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रभर करण्यात येईल याची नोंद घ्यावी. दि.४ डिसेंबर रोजी भव्य रास्ता रोको आंदोलन करुन निवेदन देण्यात येत आले.विजय शिरसागर, बालाजी गायकवाड शिवाजी गायकवाड, दत्ता साठे, सारिका कांबळे, संतोष मोरे,हेमंत कुमार खंदारे,सुरज लोंढे, पांडुरंग कदम, मारुती शिरसागर, मुकेश देडे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते आंदोलन ठिकाणी उपस्थित होते

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे