
लोहारा-प्रतिनिधी
लोहारा नगरपंचायत नगरसेवक अमिन यासिन सुंबेकर यांनी आपल्या ५१ व्या वाढदिवसा निमित्त जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रीय शाळेला कचराकुंडी भेट स्वरूपात दिली.
दानशूर म्हणून ज्यांची ओळख आहे असे नगरसेवक अमिन यासिन सुंबेकर यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेच्या वतीने मुख्याध्यापक दतात्रय फावडे यांनी सत्कार केला.आयोजित कार्यक्रमाला केंद्रप्रमुख चंदनशिवे सर उपस्थित होते.ओला कचरा व सुका कचरा कसे वेगळे करायचे या बद्दल बालाजी मक्तेदार यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली.यावेळी सुरेश साळुंके,दयानंद क्षीरसागर,सुरेश अंबुरे,मोहन शेवाळे,अनंत सुतार,बालाजी यादव,गुरुनाथ पांचाळ ,संतोष माळवदकर,सचिन शिंदे,अर्चना साखरे,ज्योती पाटील ,प्रमोद सरवदे ,नेहा भंडारे,वर्षा चौधरी,रमेश बनसोडे,सोनम कांबळे,तांबोळी मॅडम,बोरसुने सर,अतुल भड,निदेशक शिक्षक चिदानंद जट्टे,शिवकर सर व गिराम सरव विद्यार्थी उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुर्यकांत पांढरे यांनी केले