महायुतीच्या उमेदवार सौ.अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ लोहारा शहरात भव्य सभा संपन्न
Post-गणेश खबोले

लोहारा(इकबाल मुल्ला)
उस्मानाबाद (धाराशिव) लोकसभा मतदारसंघातील शिवसेना – भारतीय जनता पार्टी – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – रिपाई – रासप महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौ.अर्चनाताई राणाजगजीतसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ लोहारा शहरात दि.4 मे 2024 रोजी भव्य सभा संपन्न झाली. या भव्य प्रचार सभेस माजी मंत्री बसवराज पाटील, माजी खा.प्रा. रविंद्र गायकवाड, आ. ज्ञानराज चौगुले, महायुतीच्या उमेदवार सौ.अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील, शिवसेना प्रवक्त्या सौ.ज्योतीताई वाघमारे, राष्टवादी कॉग्रेस प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार, भाजपा उमरगा लोहारा पक्षनरीक्षक सुधीर पारवे, राष्ट्रवादी कॉग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे, भाजपा उमरगा लोहारा विधानसभा प्रमुख राहुल पाटील, युवती सेना मराठवाडा निरीक्षक ॲड.कु. आकांक्षाताई ज्ञानराज चौगुले, दिलीप भालेराव, शिवसेना जिल्हा प्रमुख मोहन पणुरे, शिवसेना तालुका प्रमुख जगन्नाथ पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष शिवशंकर हत्तरगे, राष्टवादी कॉग्रेस प्रदेश कार्यकारणी सदस्य किशोर साठे, राष्टवादी कॉग्रेस तालुकाध्यक्ष सुनिल साळुंके, नगराध्यक्ष सौ.वैशालीताई खराडे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा नगरसेविका सौ.आरती गिरी, गटनेत्या सौ. सारिका बंगले, नगरसेविका कमल भरारे, कृ.उ.बाजार समिती माजी सभापती दिनकरराव जावळे पाटील, अमर बिराजदार, अदि उपस्थित होते.
माजी मंत्री बसवराज पाटील प्रचार सभेत बोलताना म्हणाले की, प्रधान नरेंद्र मोदी उत्तम काम करीत आहेत. ते देशाचं एक कणखर नेतृत्व आहे. जगातिकस्तरावर त्यांना चांगला मान आहे. त्यांच्यामुळे देशाच्या सीमा सुरक्षित आहेत. ‘सबका साथ सबका विकास, सबका प्रयास’ हे ब्रीद घेऊन नरेंद्र मोदी काम करीत आहेत. केंद्रात गेल्या 10 वर्षांमध्ये मोदी सरकारने प्रचंड गतीने विकास केला आहे. देशातल्या कानाकोपऱ्यात, ग्रामीण भागांपर्यंत हा विकास पोहोचला असून आपल्या धाराशिव जिल्ह्यात देखील अनेक लाभार्थ्यांना याचा मोठा लाभ मिळाला आहे. म्हणूनच पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी सौ.अर्चना पाटील यांना प्रचंड मताधिक्याने संसदेत पाठवण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. असे सांगीतले. व तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित (दादा) पवार यांच्या कडे पाठपुरावा करुण आ. ज्ञानराज चौगुले यांनी लोहारा शहरात व उमरगा लोहारा तालुक्यात मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुण विकास कामे मोठ्या प्रमाणात केली आहेत. आपल्या महायुतीच्या उमेदवार सौ. अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांनी जि.प.च्या उपाध्यक्ष असताना महिलांची मोठ्या प्रमाणात कामे करुण निधी उपलब्ध करुण विकास कामे मोठ्या प्रमाणात केली आहेत. तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी महायुतीचे उमेदवार सौ. अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांना निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी माजी खसदार प्रा.रविंद्र गायकवाड, आमदार ज्ञानराज चौगुले, राष्ट्रवादी कॉग्रेस प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार, शिवसेना प्रवक्त्या सौ.ज्योतीताई वाघमारे, महायुतीच्या उमेदवार सौ.अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील, युवती सेना मराठवाडा निरीक्षक ॲड. कु. आकांक्षाताई ज्ञानराज चौगुले, भाजपा उमरगा लोहारा विधानसभा प्रमुख राहुल पाटील यांनी यावेळी भाषण करून मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी माजी गटनेते अभिमान खराडे,नगरसेवक अविनाश माळी, शिवसेना नेते राजेंद्र माळी, बाजार समितीचे माजी चेअरमन दयानंद गिरी, भाजपा तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला, शिवसेना शहर प्रमुख श्रीकांत भरारे, उपनगराध्यक्ष आयुब हबीब शेख, पं.स. माजी सदस्य दिपक रोडगे, नगरसेवक दिपक मुळे, जालिंदर कोकणे, गौस मोमिन, हाजी अमिन सुंबेकर, सौ. शमाबी आयुब शेख,
प्रशांत काळे, के.डी.पाटील, मेडिकल असोसिएशन तालुकाध्यक्ष प्रमोद बंगले, रोहयोचे माजी चेअरमन आयुब अब्दुल शेख, भाजपा तालुका उपाध्यक्ष संपत देवकर, हाजी बाबा शेख, ओम कोरे, उपसरपंच विजय लोमटे, सरपंच बबन फुलसुंदर, हरी लोखंडे, आयनुद्दीन सवार, संतोष फावडे, मल्लीनाथ घोंगडे, सरपंच वैभव पवार, सुरेश दंडगुले, भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष बाबा सुंबेकर, परवेज तांबोळी, नयुम सवार, शमशोद्दीन भोंगळे, वहाब हेड्डे, नारायण माळी, शिवसेना तालुका उप प्रमुख परमेश्र्वर साळुंके, आप्पा होनाळकर, अनिल आतनुरे, प्रमोद पोतदार, गौरव गोसावी, प्रतिक गिरी, यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, महिला, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रसताविक माजी गटनेते अभिमान खराडे व सुत्रसंचालन हरी लोखंडे यांनी केले तर आभार नगरसेवक दिपक मुळे यांनी मानले.