
लोहारा-प्रतिनिधी
न्यू व्हिजन इंग्लिश स्कूल लोहारा येथे दि: 27 फेब्रुवारी रोजी कुसुमाग्रज उर्फ विष्णू वामन शिरवाडकर यांची जयंती ” मराठी राजभाषा दिन ” म्हणून साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना कवी यशवंत चंदनशिवे म्हणाले,
जशी दृष्टी तशी सृष्टी दिसते, वाचन वाढवलात की कविता स्फुरते, त्यासाठी दृष्टी तशी असावी लागते. अनेक स्वरचित कविता यावेळी त्यांनी आपल्या ओघवत्या वाणीनीने म्हटल्या.
” नदी काठच्या माळरानावर,
नुसताच रानवारा झोंबतो आहे.निवांत विसाव्यासाठी
मी एक झाड शोधतो आहे. “
यातून दुष्काळ परिस्थिती किती वाईट आसते हे ” काम” या कवितेतून सांगितले तर,
” माणसांच्या गर्दीत मी,
माणुस शोधतो आहे.
माणसातला चांगुलपणा वेचण्यासाठी,
मी एकटाच उभा आहे.
या कवितेतून त्यांनी “हरवलेली माणुसकी ” मांडण्याचा प्रयत्न केला.बालकवितेच्या माध्यमातून विद्यार्थीना ग्रामीण जीवन, निसर्ग आणि नाती जोपसणारी कविता, ” आई …! ऐक ना ” या कवितेतून
” आजी म्हणते गावाकडे
खुप खुप पक्षी असतात.
बाबांना नसतेच कधी सुट्टी,
तूझी असते आजीशी कायमची गट्टी ” हि कविता म्हणाले. तर आई” या कवितेतून लहान मुलांचे दप्तराचे ओझे याची खंत व्यक्त करणारी कविता,
” आई दप्तराच्या ओझ्यानं,
खुप सा-या विषयानं,
दिवसभराच्या शाळेनं,
वैताग आलाय गं…! “
हि कविता म्हटली. अशा अनेक कविता, चारोळ्या, गझल यावेळी त्यांनी मांडून विद्यार्थीना कवितेच्या बागेचा फेरफटका मारला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य शहाजी जाधव सर, तर प्रमुख उपस्थिती श्रीमती मिरा माने ( मराठी विभाग शिक्षिका) ,श्री. नामदेव जाधव ( पोतदार इंग्लिश स्कूल, पुणे) हे उपस्थित होते. यावेळी गौरव जाधव, माही गुन्नेवार, अंशिका त्रिपाठी, मनस्वी देवकर आदि विद्यार्थीनी स्वलिखित, कवी कुसुमाग्रज यांच्या कविता म्हटल्या. श्रीमती मिरा माने यांनी कुसुमाग्रज यांच्या जीवनावर मार्गदर्शन केले तर अध्यक्षीय समारोप प्राचार्य शहाजी जाधव यांनी विद्यार्थीना आपल्या काॅलेज जीवनातील साहित्यिक अनुभव विशद केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.सविता जाधव यांनी केले तर या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक, शिक्षीका व विद्यार्थीनी परिश्रम घेतले.