एकलव्य विद्या संकुलात माजी विद्यार्थ्यांचा भव्य मेळावा संपन्न,1993 पासूनचे विद्यार्थी आले एकत्र

एकलव्य विद्या संकुलात माजी विद्यार्थ्यांचा भव्य मेळावा संपन्न,1993 पासूनचे विद्यार्थी आले एकत्र
यमगरवाडी /न्यूज सिक्सर
यमगरवाडी तालुका तुळजापूर येथील भटके विमुक्त विकास प्रतिष्ठान संचलित एकलव्य आश्रम शाळेत मागील 25 वर्षापासून शिकून बाहेर पडलेल्या आणि वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये उत्तुंग कामगिरी करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांसाठी, संस्थेच्या वतीने भव्य अशा क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी महाराष्ट्र भरामधून,पोलीस खाते, शिक्षण खाते,इंजिनियर्स अशा विविध क्षेत्रात काम करणाऱ्या, 227 विद्यार्थ्यांनी हजेरी लावली या दोन दिवसांमध्ये विद्यार्थ्यांच्या, सुनियोजित अशा *यमगरवाडी प्रीमियर लीग,उत्सव मैत्रीचा* या बॅनरखाली सुंदर अशा क्रिकेट स्पर्धा संपन्न झाल्या 15 विद्यार्थ्यांचा एक आशा आठ टीम करण्यात आल्या होत्या. दोन गटांमध्ये या टीमची विभागणी करून साखळी पद्धतीने सामने खेळवण्यात आले.सर्वच सामने अतिशय रोमहर्षक आणि उत्साहाच्या वातावरणात पूर्ण झाले. तयार केलेल्या संघांना वेगवेगळ्या गडांची नावे देण्यात आली होती. त्याचबरोबर सर्व संघांना वेगवेगळ्या रंगाचा गणवेश तयार करून घेण्यात आला होता. त्यामुळे अतिशय भारावलेले असे वातावरण विद्या संकुलामध्ये मागील तीन दिवसात पहायला मिळाले. मैदानाच्या अवतीभोवती वेगवेगळ्या रंगाचे गणवेश घातलेले माजी विद्यार्थी वावरताना दिसत होते. जल्लोष,आनंद आणि उत्साह याबरोबरच शिस्तीचे ही पालनही सर्व विद्यार्थ्यांनी केल्याचे दिसले. संस्थेचे पदाधिकारी,विद्या संकुलामध्ये काम करणारे सर्व कर्मचारी.या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांच्या सोबत सहभागी झाले होते. या स्पर्धेमध्ये शिक्षक म्हणून सोलापूर येथे कार्यरत असलेला माजी विद्यार्थी,मनोज काळे याच्या रायगड या संघाने विजेतेपद पटकावले,तर उमरगा येथे स्वतःचा व्यवसाय करीत असलेला माजी विद्यार्थी प्रकाश विभुते याच्या प्रतापगड या संघाने उपविजेतेपद पटकावले. स्पर्धा संपल्याबरोबर मैदानावरच बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संस्थेचे सचिव विवेक आयाचीत यांच्या हस्ते करण्यात आला.दोन्ही दिवस दुपारच्या मोकळ्या वेळी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आलेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांशी, वर्तमान स्थिती जाणून घेण्यासाठी संवाद साधला व मार्गदर्शन केले. यावेळी भटके विमुक्त विकास प्रतिष्ठान चे कार्यवाहक मा.विवेक आयाचीत, तसेच संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.अभयजी शहापूरकर दिवसभर उपस्थित होते. संस्थेचे पदाधिकारी तसेच या उपक्रमाचे मार्गदर्शक राजाभाऊ गिजरे तीन दिवस पूर्ण वेळ मुलांसोबत उपस्थित होते मुख्याध्यापक विठ्ठल म्हेत्रे व अण्णासाहेब कोल्हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली माजी विद्यार्थी समन्वय समितीचे,अनिल घुगे, अण्णासाहेब मगर,यशवंत निंबाळकर व अशोक बनकर यानी, संपूर्ण तीन दिवसाचे अभ्यासपूर्ण नियोजन केले होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रकल्पातील सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले तसेच सर्वांनी पूर्ण वेळ उपस्थिती ही ठेवली. कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल समन्वय समितीचे सगळीकडे कौतुक होत आहे.