तुळजापूर तहसील कार्यालय येथे जनता दरबारास उस्फुर्त प्रतिसाद
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

तुळजापूर तहसील कार्यालय येथे जनता दरबारास उस्फुर्त प्रतिसाद
तालुक्यातील व शहरातील नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेत;येत्या पंधरा दिवसात निकाली काढण्यास दिल्या आदेश
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी तुळजापूर तहसील कार्यालय येथे आयोजित केलेल्या जनता दरबारास तालुक्यातील जनतेने उस्फुर्त प्रतिसाद देत सहभाग नोंदवला या जनता दरबारात विविध कार्यालयातील प्रलंबित 240 अर्ज दाखल झाले यावर तात्काळ संबंधित विभागाच्या कर्मचारी अधिकारी यांना सुचना देवून येत्या पंधरा दिवसात अर्ज निकाली काढण्यात यावेत असे संबंधित विभागाला आदेश देण्यात आले
यावेळी तहसीलदार अरविंद बोळंगे,पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर, अव्वल कारकून नवनाथ येलगुंडे , महिला आघाडी संघटक सौ.शामलताई पवार (वडणे) तालुकाप्रमुख जगन्नाथ गवळी ,उप तालुकाप्रमुख सुनील जाधव , अमोल जाधव, शाम पवार, शहरप्रमुख सुधीर कदम ,अर्जुनआप्पा साळुंखे ,सागर इंगळे ,प्रतिक रोचकरी, विकास भोसले, डॉक्टर जितेंद्र कानडे बाळकृष्ण पाटील , श्याम माळी, शिवाजी कदम ,,कृष्णा मोरे, धुळाप्पा रेक्षा ,अमोल जाधव, अनमोल साळुंखे ,नवनाथ जगताप, राहुल खपले, बाळासाहेब शिंदे, बापूसाहेब नाईकवाडी बसवराज बिराजदार ,तुळशीराम बोबडे ,दगडू नाना शिंदे ,सिध्दराम कारभारी, चेतन बंडगर, आदिंसह पदाधिकारी उपस्थित होते