ब्रेकिंगमहाराष्ट्र
शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत तानाजी म्हेत्रे यांना जिल्ह्यातील प्रथम क्रमांकाच्या पारितोषिकांसोबत इतर सात पारितोषिके प्रधान
ज्ञानेश्वर गवळी तुळजापूर

शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत तानाजी म्हेत्रे यांना जिल्ह्यातील प्रथम क्रमांकाच्या पारितोषिकांसोबत इतर सात पारितोषिके प्रधान
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
राज्य शैक्षणीक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे मार्फत आयोजित….शिक्षकांसाठी दर्जेदार व्हिडियो निर्मिती स्पर्धा 2024.
यामध्ये महाराष्ट्र विद्यालय,तीर्थ बु ता.तुळजापूर. येथील सहशिक्षक तानाजी सयाजी म्हेत्रे यांनी तयार केलेल्या व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत इयत्ता 9ते 10 इंग्रजी विषय गटात धाराशिव जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळाला. तसेच इतर विषय आणि वर्ग गटातून जिल्हा व तालुका स्तरावर सात पारितोषिके पटकावली. यानिमित्त शाळेने सत्कार समारंभाचे आयोजन केले होते. महाराष्ट्र विद्यालय,तीर्थ बु.शाळेचे मु.अ पाटील सर, तावशे सर,जाधव सर,काशीद सर इतर कर्मचारी आणि सर्व विद्यार्थ्यांनी तानाजी म्हेत्रे यांच्या यशाबद्दल सत्कार व अभिनंदन केले.