युवा उद्योजक राहुल गवळी यांना उद्योग भूषण पुरस्काराने करण्यात आले सन्मानित

युवा उद्योजक राहुल गवळी यांना उद्योग भूषण पुरस्काराने करण्यात आले सन्मानित
धाराशिव /न्यूज सिक्सर
धाराशिव येथील युवा उद्योजक तथा सिव्हिल इंजिनीयर राहुल गवळी यांना यशदा ऑडोटोरियम, यशवंतराव चव्हाण अकॅडमी ऑफ डेव्हलपमेंट, राजभवन गणेश खिंड, बाणेर, पुणे येथे ”बेस्ट बिझनेसमॅन इन कन्स्ट्रक्शन फिल्ड” चा राज्यस्तरीय”उद्योग भूषण पुरस्कार” पद्मश्री सुधारक ओळवे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला राहुल गवळी हे बांधकाम व्यवसायिक असून बालाजी ग्रुप च्या माध्यमातून बांधकाम क्षेत्रात विविध व्यवसायात तसेच सामाजिक कार्यात नावलौकिक केलेले आहे, तसेच व्यवसायातील नफा तोटा विचारत न घेता धाराशिव शहरातील विविध अकरा महापुरूषांचे चौक सुशोभीकरणाचे काम पूर्ण केले आहे, कामाचा दर्जा, गुणवत्ता आणि नाविन्यता पाहून नागरिकांतून ही समाधान व्यक्त केले जाते, त्यांच्या या सर्व कामाची दखल घेऊन आज पुणे येथे राहुल यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.