जिल्हाधिकारी व एस पी कुलकर्णी यांच्या जिल्हा डॉल्बीमुक्त संकल्पनेला प्रत्यक्ष जवाहार गल्ली गणेश मंडळाने अंमलात आणले आहे
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

जिल्हाधिकारी व एस पी कुलकर्णी यांच्या जिल्हा डॉल्बीमुक्त संकल्पनेला प्रत्यक्ष जवाहार गल्ली गणेश मंडळाने अंमलात आणले आहे
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
प्रत्येक शहराचा मानाचा गणपती असतो.तसा तुळजापूर शहरातील जवाहर तरुण गणेश मंडळ जवाहार गल्लीत मानाचा गणपती म्हणून वर्षानुवर्ष मानला जाणारा गणेश उत्सव मंडळाच्या गणपतीची जवाहर गल्लीची अशी ओळख आहे. गणेश चतुर्थी निमित्त पारंपारिक पद्धतीने शांततेत भव्य मिरवणूक ढण्यात गणेश विसर्जन करण्यात आले.
अतिशय आनंदाच्या व उत्साहाच्या वातावरणामध्ये पारंपारिक पध्दतीने टाळ मृदंग,ढोल ताशाच्या गजरात जवाह तरुण गणेश मंडळ तुळजापूर यांच्या वतीने श्री गणेश मिरवणुक संपन्न झाली. जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे व जिल्हा पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांच्या जिल्हा डॉल्बीमुक्त संकल्पनेला प्रत्यक्ष अंमलात आणून हा गणेश उत्सव साजरा केलेला उद्या मंगळवार दि. ३ ऑक्टोबर रोजी श्रीदेवीचे पोथी समाप्ती निमित्त अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित केला आहे तरी शहरातील नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आव्हान मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत रसाळ,तसेच मंडळातील सर्व सदस्य पदाधिकारी यांनी केले आहे