वारसाचा विचार न करता व्यसनाच्या आहारी जाऊन १ हेक्टर ८१ आर जमिनीचा काढला काटा;फेरनोंद न घेण्यास वारसांची तलाठीसाहेबांकडे धाव
नळदुर्ग पोलीस ठाण्यात ४२० ची करणार तक्रार

वारसाचा विचार न करता व्यसनाच्या आहारी जाऊन १ हेक्टर ८१ आर जमिनीचा काढला काटा;फेरनोंद न घेण्यास वारसांची तलाठीसाहेबांकडे धाव
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर तालुक्यातील होर्टी येथील शेत जमिन गट नंबर ११६ मधील क्षेत्र १ हेक्टर ८१ आर हेवडी जमीन वारसाचा विचार न करता दस्त नोंदणी केलेल्या बाबत दि.१५ मे रोजी तलाठी व मंडळ अधिकारी यांना सौ.राधा संतोष भोसले व मुलगा समर्थ संतोष भोसले यांनी फेर नोंद घेवूनये असा तक्रारी अर्ज दिला आहे.
तुळजापूर तालुक्यातील मौजे होर्टी येथील शेत जमीन गट नंबर- ११६ मध्ये महादेव शिवाजी गायकवाड रा. चिकुंद्रा येथील रहिवासी असुन यांनी माझे पती संतोष लक्ष्मण भोसले यांना दारु पाजुन नशा पाणी करुन मौजे होर्टी येथील शेत जमीन गट नंबर-११६ क्षेत्र ० १’ हेक्टर ८१ आर ऐवढी जमीन खरेदी करुन घेतली आहे.सदरील जमीन ही वडीलोपार्जीत आहे या मध्ये माझा व माझ्या कुटुंबातील वारसांचा जरा ही विचार अथवा सही घेतलेली नाही सदरच्या जमीनीवर आमची उपजिवीका असुन माझा व माझ्या कुटुंबाचा जमीनीशिवाय इतर जगण्याचे साधन नाही.
असे असताना महादेव शिवाजी गायकवाड यांनी आमचा वारसांचा जराही विचार न करता सदरची जमीन माझे पती संतोष लक्ष्मण भोसले यांना नशाअधिन दारु पाजुन सदरची जमीन कवडीमोल किमंतीत खरेदी घेतलेली आहे.तरी तसिलदार अरविंद बोळंगे, व मंडळ अधिकारी,तलाठी यांनी सदरील जमीनीची खरेदी ही बेकायदेशीर केलेली असुन फेर नोंद घेवून नये दोषी व्यक्ती खरेदी घेणार व साक्षीदार यांच्यावर योग्य ती कार्यवाही करुन माझी जमीन मला परत मिळावी व मला योग्य तो न्याय द्यावा असे लेखी तक्रार देण्यात आली आहे या तक्रारी अर्जावर सौ.राधा संतोष भोसले व मुलगा समर्थ संतोष भोसले यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.