ब्रेकिंग
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने गटशिक्षणाधिकारी सुभाष चव्हाण यांचा सत्कार..
Post- गणेश खबोले

लोहारा-प्रतिनिधी
लोहारा पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी पदाचा कार्यभार सुभाष चव्हाण यांना मिळाल्याबद्दल महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती लोहारा यांच्या वतीने यथोचित सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
या सत्कारा वेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा प्रवक्ते कमलाकर येणेगुरे,तालुका अध्यक्ष भिमाशंकर डोकडे,कैलास माणिकशेट्टी,सुभाष इंगळे,नागेश बंगले, दत्तात्रय फावडे, सचिन पाटील,मल्लिकार्जुन कलशेट्टी,गणेश गोरे,बब्रुवान बादुले,खिझर मोरवे,बालाजी साळुंके आदी शिक्षक उपस्थित होते.