राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग विभागाच्या धाराशिव जिल्हाध्यक्ष पदी जालिंदर कोकणे
Post-गणेश खबोले

लोहारा-प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उद्योग विभागाच्या धाराशिव ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी लोहारा नगरपंचायत नगरसेवक जालिंदर कोकणे यांची नियुक्ती करण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस चे सर्वेसर्वा अजित पवार यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उद्योग विभाग प्रदेशाध्यक्ष सुभाष खु.मालपाणी,मराठवाडा विभागीय अध्यक्ष श्रीधर नागपूरकर मार्गदर्शनाखाली जालिंदर कोकणे यांना राष्ट्रवादी काँग्रेस धाराशिव जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन सामाजिक,राजकीय पक्षाची बांधणी करावी पक्ष वाढी साठी प्रयत्न करावे यासाठी शुभेच्छा दिल्या. धाराशिव येथील पक्ष कार्यालयात निवडीचे पत्र देण्यात आले यावेळी राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष हाजी बाबा मस्तान शेख,उस्मानाबाद सामाजिक न्याय विभाग जिल्हा अध्यक्ष अतुल जगताप,उस्मानाबाद तालुकाध्यक्ष प्रशांत फंड यांच्यासह अन्य पदाधिकारी कार्यकर्ता उपस्थित होते