
लोहारा (प्रतिनिधी)
लोहारा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि केंद्र अंतर्गत असलेले उपकेंद्र भातागळी,मार्डी,लोहारा (खुर्द), हिप्परगा (रवा) या ठिकाणी प्रौढ बी.सी.जी लसीकरण मोहीमचा शुभारंभ नुकताच करण्यात आला.प्रौढ बी. सी. जी लसीकरण मध्ये ६० वर्षावरील सर्व लाभार्थी १८ वर्षावरील सर्व कुपोषित सर्व लाभार्थी,१८ वर्षावरील सर्व मधुमेह लाभार्थी,१८ वर्षावरील सर्व धूम्रपान करणारे लाभार्थी,५ वर्षापासून क्षय रोगाचा चा उपचार घेतलेले रुग्ण,३ वर्षांपासून क्षय रोगाचा उपचार घेत असलेल्या रुग्णाच्या घरातील सर्व लाभार्थी या निकषात येणाऱ्या सर्व १८ वरील सर्व लाभार्थी ना बी सी जी लस दिली जाणार आहे.
कानेगाव प्राथमिक आरोग्य केंद्र आणि अंतर्गत येणाऱ्या गावातील लाभार्थी ने जास्तीत जास्त लोकानी लस घेऊन टी बी मुक्त भारत मोहीम सहकार्य करावे असे अहवान प्रा.आ.केंद्र कानेगाव येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.धीरज सोमवंशी,डॉ.प्रियंका बंदीछोडे व सर्व कर्मचारी यांच्या वतीने करण्यात येत आहे.