
कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचा अंगारा
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
महाराष्ट्राची आदिशक्ती कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या अंगाच्याचे महोत्व .
अंगारा तयार कसा होतो .
शारदीय नवरात्र महोत्सव च्या ९ व्या माळेला होमकुंडावरर्ती धार्मिक विधी घटोत्थोपन कार्यक्रम होत असतो १० व्या दिवशी विजया दशमी यादीवशी महिषासुरासचा वध केल्याचा आनंद उत्सव सिमोलंघन खेळुन झाल्यानंतर देविची पालखी होम कुंडात दांडा विरहीत विसर्जन केले जाते
त्याच बरोबर देवीच्या परड्या विर्सजीत केल्या जात असतात या सर्वांतुन होनारी राख ही देवीच्या दोन महापुजा , एक उपपुजात अंगारा म्हणुन वापरला जात असतो त्यातील दोन महापुजा म्हणजे सकाळी अभिषेक झाल्यानंतर तसेच सायंकाळीचाही अभिषेक झाल्यानंतर ओला अंगारा देवीवरर्ती ओवाळुन भोपे पूजारी स्वताच्या कपाळी बोल भवानी माता की जय असा नाम घोष करून कपाळी लावीत असतात यानंतर देविच्या सिंहगाभाऱ्यातील सर्व पुरूष भक्तांना कपाळी लवतात तर महिला भक्तांना अंगारा देवीचा अंगारा दिला जात असतो हा अंगारा भक्तगन आपल्या घरी घेऊन जाऊन दररोज कपाळी लावीत असतात तर काही भगत गन थोडा थोडा प्रसाद म्हणुन खात आतात
कपाळी अंगारा लावण्याचा व प्रसाद म्हणून खाण्याचा अनाधी काळापासून हा प्रकार चालत आलेला आहे . भक्तगनांना याकृतीतून वेग वेगळे अनुभव येत असतात . देवीच्या दोन्ही अभिषेक पुजा चालु होण्याअगोदर देवीचे मुख्य भोपे पुजारी अतुल मलबा कोरडा अंंगारा आपल्या हतावरर्ती घेऊन ओला करुन आपल्या कपाळी हतावरर्ती , पोटावर , छातीवर , पाठीवर तीन बोटाचा अंगारा लावून अभिषक पुजा चालु करण्यासाठी देविच्या सिंहगाभाऱ्यात जातात तसेच देवीचे महंत तुकोजीबुवा, चिलोजीबुवा हे देखील पक्षाळ पुजेस कोरडा अंगारा घेऊन जात असतात जसे देविला हळदी कुंकूवाचा जसा मान आहे तसाच अंगाऱ्यालाही या तुळजाभवानी मंदिरात पुण्यपावण नगरीत महोत्व आहे .