न्यूज सिक्सर मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

राष्ट्रीय सेवा योजना शिबिरामध्ये आरोग्य तपासणी

राष्ट्रीय सेवा योजना शिबिरामध्ये आरोग्य तपासणी

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या मौजे होनाळा येथील विशेष वार्षिक शिबीरामध्ये १८ जानेवारी 23रोजी सकाळी ९:००वाजता आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले, या वेळी ४५गावकऱ्यांनी आपली आरोग्य तपासणी करून घेतली.

यावेळी उच्च रक्तदाब, मधुमेह, गुडघेदुखी, डोळ्यांचं आरोग्य इ.तपासण्या करण्यात आल्या.ज्या गावकऱ्यांना गंभीर समस्या असतील त्यांना पुढील तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर आणि जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद येथे पाठवण्यात आले.

या वेळी उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर येथील डॉ नितु कदम ,श्रीमती बी.सी.हिरेमठ,श्रीमती डी एस जगदाळे, श्रीमती आश्विनी देशमुख यांचे सहकार्य लाभले हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कार्यक्रम अधिकारी डॉ आंबादास बिराजदार,डॉ अशोक कदम,प्रो डॉ अशोक मरडे, प्रा डॉ शिवाजी जेटीथोर, श्री हणमंत भुजबळ यांनी प्रयत्न केले.यावेळी ग्रामस्थ व स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे