श्री तुळजा भवानी मातेच्या चरणी मराठी सिनेअभिनेत्री सुप्रिया पाठारे झाल्या लीन…..
Post-गणेश खबोले

तुळजापूर-प्रतिनिधी
श्री तुळजा भवानी मातेची साडीचोळीने ओटी भरून मराठी सिनेअभिनेत्री सुप्रिया पाठारे यांनी घेतले देविचे दर्शन.मराठी मनोरंजन विश्वातली एक लोकप्रिय आणि घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणून सुप्रिया पाठारे ओळखली जाते. सुप्रिया यांनी आजवर अनेक मालिका, चित्रपट, नाटक यामध्ये महत्वाच्या भूमिका केलेल्या आहेत.कधी विनोदी भूमिका करत भरभरून हसवलं तर कधी नकारात्मक भूमिका करून सर्वांचं लक्ष वेधलं. मालिका विश्वात तर सुप्रियाताई म्हणजे अगदी मुरलेल्या अभिनेत्री म्हणून सर्वदुर परिचित आहेत. सध्याही त्या ‘ठिपक्यांची रंगोळी’ या मालिकेत काम करत आहेत.
आज जरी त्या अत्यंत प्रसिद्ध अभिनेत्री असल्या तरी एक काळ असा होता की त्यांनी अत्यंत खडतर दिवस काढले आहेत.शारदीय नवरात्र सुरू होण्यापुर्वी आज दि.२४ सप्तेंबर २०२४ रोजी देविची यथासांग पुजाअर्चा केली त्यांचे पौरोहित्य भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम व नाना कदम यांनी केले.भोपे पुजारी मंडळाच्या वतीने अध्यक्ष अमरराजे कदम यांनी देविची प्रतिमा व पादुका असलेली मुर्ती देवून सत्कार करण्यात आला.त्यानंतर मंदिर संस्थानकडून तहसिलदार तथा व्यवस्थापक श्रीमती माया शिंदे यांनी देविची साडी व प्रतिमा देवून सत्कार केला.