तुळजापूर नगर परिषदेचे अधिकारी सुभाष क्षिरसागर सेवानिवृत्त निमित्त नगरपालिकेच्या वतीने सत्कार
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

तुळजापूर नगर परिषदेचे अधिकारी सुभाष क्षिरसागर सेवानिवृत्त निमित्त नगरपालिकेच्या वतीने सत्कार
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर नगर परिषदेचे अधिकारी सुभाष क्षिरसागर हे दिनांक 30-9-23 रोजी नगर परिषदेच्या सेवेतून सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्ताने नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या वतीने त्यांचा सत्कार दिनांक 03-10-2023 रोजी सकाळी 11:45 वाजता आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमास मुख्य अतिथी म्हणून लक्ष्मण कुंभार मुख्याधिकारी नगरपरिषद तुळजापूर व प्रमुख पाहुणे म्हणून सचिन रोचकरी माजी नगराध्यक्ष नगरपरिषद तुळजापूर हे उपस्थित होते. वरील कर्मचाऱ्यांची सेवा ३० वर्षापेक्षा अधिक काळ झालेले असून, त्यांनी नगरपालिकेच्या विविध भागांमध्ये काम केल्याचा उल्लेख भाषणात सचिन रोचकरी यांनी मांडले. तसेच अमर मगर माजी नगरसेवक यांनी हे दोन्ही कर्मचारी सेवेने जेष्ठ होते त्यांच्या बद्दल गौरवउद्गगार काढले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अधीक्षक वैभव पाठक, संघटनेचे अध्यक्ष दत्ता साळुंखे तसेच लेखापाल आमीत खेलाले, नगर अभियंता अशोक सनगले , श्रीमती प्रफुल्लता बरुरकर, श बापू रोचकरी, नागेश काळे, बालाजी जाधव इत्यादी कर्मचारी उपस्थित होते.