सामाजिक समतेसाठी व मानवी कल्याणासाठी तथागत बुद्धांच्या विचारांची गरज-भन्ते धम्मसार

सामाजिक समतेसाठी व मानवी कल्याणासाठी तथागत बुद्धांच्या विचारांची गरज-भन्ते धम्मसार
नळदुर्ग/दादासाहेब बनसोडे
तथागत बुद्धांचा धम्म आणी अष्टांगिक मार्गाचा अवलंब केला प्रात्येक मानवाच्या जीवनात यशस्वी होण्यासाठी स्वतःमध्ये काही बदल करणे गरजेचे आहे . शिका ! संघटित व्हा !! आणि संघर्ष करा मूलमंत्र देऊन तथागत बुद्धांच्या धम्माचा डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी १४ ऑक्टोबर १९५६ ला विजयादशमी दिनी मानवाच्या कल्याणासाठी धम्माचा स्वीकार केला
तथागत भगवान गौतम बुद्ध आणी त्यांच्या धम्माची प्रभावशाली मांडणी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी खुप चांगल्या पद्धतीने केली गेली आहे यामध्ये पारमिता आणि अष्टांगिक मार्गाचा अवलंब करावा समेक दृष्टी असावी , सम्यक समाधी असावी , संमेक संकल्प असावा , सम्यक समाधी असावी , सम्यक वाचा असावी , सम्यक व्यायाम असावा , सम्यक कर्मान्त असावा , आणि संमेक आजीवका असावी लागते तरच मानवी जीवनाच्या कल्याणाचा उद्धार होणार .
कारण आजच्या युगामध्ये तथागत बुद्धांच्या धम्माची प्रत्येक तरुणाला खूप मोठ्या विचारांची गरज आहे विविध पैलू मध्ये भटकत गेलेला हा तरुण असून तो सम्यक विचार घेऊन आपण एकत्र आलो तर तथागत बुद्धांचे विचार या मानवी कल्याणाचा सन्मार्ग आसेल .
असे प्रतिपादन पुज्य भन्ते धम्मसार यानी केले .
नुकताच किल्लारी ते मुंबई चैत्यभूमी येथे श्रामनेर शिबिर बौद्ध धम्म पद रॅली चारीका घेऊन नळदुर्ग या ऐतिहासिक शहरात संपुर्ण संघ आला आतुन नळदुर्गच्या नालंदा बुद्ध विहारांमध्ये धम्मदेसना कार्यक्रम संपन्न झाला यावेळी पुज्य भन्ते धम्मसार हे बोलत होते .
नळदुर्ग शहरात पुज्य भन्ते आणि त्यांच्या संघाचं आगमन होताच राष्ट्रीय हायवे क्रमांक ६५ वरून संपूर्ण संघाला संपूर्ण भीमनगर मध्ये पायी बौद्ध धम्म पद रॅली काढून बौद्ध नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली यावेळी पूज्य भन्ते सुमंगल कराळी संघरत्न बोधि चेंबूर यानी उपस्थित बौद्ध उपासक आणी उपसिका याना धम्म देसना दिली . श्रामनेर शिबिरामध्ये एकूण २७ प्रशिक्षणार्थ्यांनी सहभाग नोंदविला याचा समारोप मुंबई चैत्यभूमी येथे संपन्न होणार आसुन प्रचार प्रसार करण्यासाठी ही धम्मपद रॅली काढण्यात आली असून या रॅलीला खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे .
पूज्य भन्ते आणी त्यांचा संघ आगमन होताच भारतीय बौद्ध महासभा शाखा नळदुर्ग व समता सैनिक दलाच्या सैनिकांनी आलेल्या सर्व पूज्य बन्ते धम्मसार पूज्य सुमंगल पुज्य भन्ते संघरत्न बोधी व त्यांच्या पूर्ण संघाचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले यावेळी नगरीचे माजी नगरसेवक किशोर ब्रह्मचार्य बनसोडे यांच्याकडून भोजनदान देण्यात आले .
स्मृतिशेष लक्ष्मण ( अण्णा ) गायकवाड यांच्या स्मरणार्थ नवनाथ लक्ष्मण गायकवाड प्राध्यापक नागनाथ लक्ष्मण गायकवाड शांताबाई लक्ष्मण गायकवाड सविता किशोर बनसोडे यांच्याकडून नळदुर्ग येथे नालंदा बुद्ध विहारास बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ भेट देण्यात आलायावेळी नळदुर्ग शहरातील सर्व बौद्ध उपासक व उपसिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कार्यक्रमाचे आभार बौद्धाचार्य दादासाहेब बनसोडे यांनी मानले