
लोहारा-प्रतिनिधी
लोहारा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेलवाडी येथे आषाढी एकादशी निमित्त दि.१६ रोजी गावात दिंडी काढण्यात आली. त्यानिमित्ताने विद्यार्थ्यांनी व गावातील भजनी मंडळातील लोकांनी अभंग आरती व गीत गायन केले.यावेळी गावातील भजनी मंडळी दगडू जाधव, शिवाजी छत्रे, तुकाराम शिंदे, बिभीषण जाधव, राजकुमार शिंदे इत्यादी भजनी मंडळी उपस्थित होते व गावातील सर्वांनी दिंडीला चांगला प्रतिसाद दिला गावातील महिला मंडळांनी दिंडीची आरती करून स्वागत केले. गावातील सर्व लोकांनी दिंडीची कौतुक केले याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक परमेश्वर सूर्यवंशी शिक्षक अनंत कानेगावकर,खिजर मोरवे,मल्लिकार्जुन कलशेट्टी,निर्मळे सुनंदा,छाया जाधव शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लहू जाधव यांनी केळी तर लक्ष्मण जाधव,विजय शिंदे यांनी खाऊ वाटप केले.गावातील भजनीकरी मंडळी तसेच हंसराज जाधव,सुभाष शिंदे अंगणवाडी मदतनीस व कार्यकर्ता उपस्थित होते. दिंडी निमित्त विद्यार्थ्यांनी फुगडी व रिंगण धरले. गावातील सर्व महिलांचा सहभाग लाभला.