
लोहारा -प्रतिनिधी
शहरातील शिवनगर येथील श्री. शिव गणेश मित्र मंडळाची गणेशोत्सव कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. अध्यक्षपदी किशोर माळी, उपाध्यक्षपदी संदीप पाटील, व शुभम माळी, सचिवपदी महेश पाटील, ओंकार बिराजदार यांची तर मिरवणूक प्रमुखपदी प्रकाश लोखंडे बाळू मुळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
शिवनगर येथील हनुमान मंदिरात श्री. शिव मित्र मंडळाचे मार्गदर्शक कमलाकर मुळे यांच्या अध्यक्षतेखाली गणेशोत्सव समिती निवडीसाठी बैठक घेण्यात आली. यावेळी कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
शिव गणेश मित्र मंडळाच्या वतीने गणेशोत्सव निमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक, समाज प्रबोधनपर, रक्तदान शिबीर, महिलांसाठी रांगोळी स्पर्धा, संगीत खुर्ची, यासह विविध भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यावर्षीही विविध धार्मिक क सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजित करण्यात येणार आहेत.
यावेळी शिव मित्र मंडळाचे अमोल बिराजदार, धनजय दरेकर, बजरंग माळी, विष्णू माळी ,अशोक दुबे, विलास लोखंडे, बाळू मुळे, महेश बिराजदार, महेश पाटील ,किशोर माळी, चेतन माळी, ओमकार बिराजदार, कुमार बिराजदार, शुभम माळी ,प्रकाश लोखंडे, योगेश बिराजदार, बालाजी माळी, संतोष माळी, बंटू माळी, वैभव पाटील, राम चपळे, लक्ष्मण क्षिरसागर, बाळू गवळी, अशोक माळी, धिरज क्षिरसागर, सुरज क्षिरसागर, यांच्यासह आदी उपस्थित होते.