पोलीस वर्धापन दिनानिमीत्त सप्ताहभर कार्यक्रमांचे आयोजन

पोलीस वर्धापन दिनानिमीत्त सप्ताहभर कार्यक्रमांचे आयोजन
उस्मानाबाद /न्यूज सिक्सर
02 जानेवारी हा दिवस पोलीस वर्धापन दिन असून 02.01.2023 ते दि. 08.01.2023 या सप्ताहा दरम्यान महाराष्ट्र राज्यात पोलीस दलाच्या वतीने ‘पोलीस वर्धापन दिन कार्यक्रम’ साजरा केला जाणार आहे. त्या अनुषंगाने मा. पोलीस अधीक्षक, श्री. अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली उस्मानाबाद जिल्हा पोलीस दलामार्फत विविध कार्यक्माचे आयोजन केले जाणार आहे.
या कार्यक्रमादरम्यान शिक्षण संस्था यांना भेटी देउन सुरक्षीतता व सुरक्षेच्या मुद्यांवर विद्यार्थ्यांशी संवाद साधणे, पोलीस मुख्यालय व जिल्ह्यातील पोलीस ठाणे येथे विद्यार्थी यांना शस्त्रे तसेच त्यांना आवडीचे व कुतूहल निर्माण करणारे इत्यादी साहित्य दाखविणे, शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस संगीत पथकाद्वारे जनजागृती, पोलीस आणि समाजाशी संबंधित विषयांवर पथनाट्य, तक्रारदारांना
मौल्यवान मुद्देमाल परत करण्यासाठी विशेष मोहिम, शाळा- महाविद्यालय येथे भेटी देउन वाहतुकीचे नियम व सुरक्षीत वाहतुक या विषयी माहिती देणे व सायबर गुन्ह्यांसंबंधी जनजागृतीविषयक संदेश असलेले बॅनर्स व महिला व बालकावर होणारे सायबर अत्याचार यांबाबत जनजागृती विषयक संदेश दर्शनी भागात लावणे अशा इत्यादी विषयांवर पोलीस वर्धापन दिनानिमीत्त सप्ताहभर कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे.