अयोध्यातील निमंत्रका मुळे प्रभू रामाचे दर्शन -आ. राणाजगजितसिंह पाटील
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

अयोध्यातील निमंत्रका मुळे रामाचे दर्शन -आ. राणाजगजितसिंह पाटील
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
अयोध्या येथील श्रीराम प्रभूची मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यास तुळजापूर तालुक्यातील निमंत्रकांमुळे प्रत्यक्षात प्रभुरामाचे दर्शन घडणार आहे असे गौरव उद्गार आमदार राणाजगदजितसिंह पाटील यांनी प्रक्षाळ मंडळ, विनोद गंगणे मित्र मंडळ, विशाल रोचकरी मित्र मंडळ आयोजित अयोध्या येथील श्रीराम मूर्ती प्रतिष्ठान सोहळ्यास निमंत्रकाचा सन्मान सोहळा सन्मान आपला अभिमान आम्हाला या सत्कार कार्यक्रमात काढले .
पुढे बोलताना ते म्हणाले गेल्या कित्येक वर्षापासून श्रीराम मंदिर व्हावे ही प्रत्येकाची अपेक्षा पूर्ण होत आहे ज्या कारसेवकांनी राम मंदिर साठी बलिदान व योगदान दिले त्यांचे स्मरण आजच्या या दिनी होत असून या माध्यमातून विनोद गंगणे व विशाल रोचकरी यांनी निमंत्रकांचा सन्मान करण्याची संधी उपलब्ध करून देऊन साक्षात प्रभू रामचंद्राचे दर्शन घडवले आहे.यावेळी महतं तुकोजी बुवा महतं मावजीनाथ बाबा, मंत्र इच्छा गिरी महाराज, प्रकाश महाराज बोधले, दत्ता अण्णा महाराज, सौ निर्मला व महादेवराव गायकवाड ,मधुकर घुगे, भारतबाई देवकर ,अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या राष्ट्रीय महामंत्रीपद निवड झाल्याबद्दल कु.अंकिता पवार हिचा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.श्रीमती भारतबाई देवकर व निर्मला गायकवाड यांना तुळजाभवानीचा शालू श्रीराम मूर्ती प्रतिष्ठान दिवशी घालण्यासाठी भारतीबाई देवकर यांना विमान प्रवास खर्चासाठी विनोद गंगणे यांनी रोख रक्कम दिली.याप्रसंगी विश्व हिंदू परिषदेचे अयोध्यातील अक्षदा वाटप व पत्रिका वाटपाचा शुभारंभ तसेच धाराशिव जिल्हा विकासनामा या दिनदर्शिकाचे प्रकाशन करण्यात आले. प्रास्ताविक पर भाषणात विशाल रोचकरी यांनी आयोध्यात होणाऱ्या श्री राम मूर्ती प्रतिष्ठान साठी तालुक्यातून निमंत्रितांचे अभिनंदन करून त्यांच्या आम्हाला अभिमान असल्याचे सांगून खऱ्या अर्थाने तुळजापूर सारख्या तीर्थक्षेत्राला हा मोठा बहुमान मिळाला असल्याचे सांगितले.महादेव गायकवाड यांनी अयोध्यातील राम मंदिर नसून राष्ट्र मंदिर असल्याचे सांगून आपण केलेल्या आजपर्यंत सेवेचे हे फळ असल्याचे सांगितले.कुमारी अंकिता पवार हिने भारत जगात नंबर एकचा देश बनत असून यामध्ये युवकांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे सांगितले.कार्यक्रम साठी माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी ,भाजपा तालुका अध्यक्ष संतोष बोबडे , गणेश जळके संतोष डोईफोडे,उपस्थित होते सूत्रसंचालन संजय मैंदर्गी यांनी तर आभार सचिन रोचकरी यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीसाठी मुख्याध्यापक गणेश रोचकरी, वैभव शिंदे ऐयाज शेख आदित्य नवगिरे यांनी परिश्रम घेतले.