वागदरी येथे राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे उदघाटन

वागदरी येथे राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे उदघाटन
वागदरी /न्यूज सिक्सर
बालाघाट शिक्षण संस्था नळदुर्ग ता.तुळजापूर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय नळदुर्ग व डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यामाने वागदरी ता.तुळजापूर येथे आयोजित राष्ट्रीय सेवायोजन शिबिराचे उदघाटन संचालक विद्यार्थी विकास मंडळ पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूरचे डॉ.केदार काळवणे.यांच्या हस्ते करण्यात आले.
“युवकांचा ध्यास गाव-शहर विकास” हे ब्रीदवाक्य घेवून कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय नळदुर्ग व डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यामाने वागदरी येथे आयोजित सात दिवसीय निवाशी राष्ट्रीय सेवायोजन शिबिराचे उदघाटन दि.१८ जानेवारी रोजी डॉ. केदार काळवणे यांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय कोरेकर हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच तेजाबाई शिवाजी मिटकर, उपसरपंच मीनाक्षी महादेव बिराजदार,ह.भ.प.सुरेशसिंग परिहार तंटामुक्त अध्यक्ष रांजेद्र पाटील,उपाध्यक्ष फतेसिंग ठाकूर आदी होते.
या प्रसंगी उदघाटनपर भाषणात बोलताना डॉ. केदार काळवणे म्हणाले की,राष्ट्रीय सेवा योजन शिबीर हे विद्यार्थी घडविण्याची कार्यशाळा असून विद्यार्थ्यांना या शिबिरातून सामाजिक बांधिलकीची जाणिव होते.युवक ही देशाची शक्ती आहे. तरुणा शिवाय देशाचा विकास नाही. देशाचे भविष्य हे युवकांच्या हाती आहे याची जाणीव युवकांना असली पाहिजे. ही जाणीव या शिबिरातून होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. रोहिणी महींद्रकर यांनी केले तर सुत्रसंचलन डॉ.निलेश शेरे व आभार प्रदर्शन डॉ. सुभाष राठोड यांनी केले.
यावेळी शिवाजी मिटकर गुरुजी, उपप्राचार्य डॉ. रामदास ढोकळे,परिवेक्षक प्रा.नेताजी जाधव,ज्ञानेश्वर पाटील,राजकुमार पवार,मुख्याध्यापिका महादेवी जत्ते, पोलीस पाटील बाबुराव बिराजदार, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामसिंग परिहार,दत्ता सुरवसे, प्रशांत मिटकर,डॉ. संतोष पवार, डॉ.जयश्री घोडके, डॉ.महेंद्र भालेराव, डॉ.सचिन देवदारे,सह आजी माजी सरपंच, उपसरपंच, ग्रा.प.सदस्य, ग्रामस्थ, महिला, महाविद्यालयाचे प्राध्यापक,विद्यार्थी, विद्यार्थ्यांनी युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.