
लोहारा/प्रतिनिधी
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाने दणदणीत विजय संपादन केल्याबद्धल लोहारा तालुका भाजपाच्या वतीने दि.8 फेब्रुवारी 2025 रोजी लोहारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाक्याची आतषबाजी मोठ्या प्रमाणात करुण जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष शिवशंकर हत्तरगे, तालुका उपाध्यक्ष प्रविण चव्हाण, जिल्हा चिटणीस विक्रांत संगशेट्टी, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष बालाजी चव्हाण, तालुका सरचिटणीस तथा जिल्हा मराठी पत्रकार संघ तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला, तालुका सरचिटणीस दगडु तिगाडे, माजी तालुकाध्यक्ष प्रमोद पोतदार, तालुका चिटणीस युवराज जाधव, रवि कुलकर्णी, युवा मोर्चा तालुका सरचिटणीस सुयेश दंडगुले, बाळु माशाळकर, संतोष कुंभार, तिम्मा माने, अनिकेत फरिदाबादकर, महादेव भालेराव, यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.