लोहारा तालुक्यातील गावात खा.ओमप्रकाशराजे निंबाळकर यांच्या प्रचारार्थ गावभेट…
Post-गणेश खबोले

लोहारा-प्रतिनिधी
धाराशिव लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी अधिकृत उमेदवार विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारार्थ लोहारा तालुक्यातील गावात सौ.संयोजनी ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी भेट देत खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन यावेळी केले आहे.
लोहारा तालुक्यातील आरणी,कानेगाव,भातंगळी,नागुर,कास्ती,बेंडकाळ, मार्डी,नागराळ ( लो),उंडरगाव,हिप्परगा (रवा), मोघा( बु),मोघा( खु),वाडी वडगाव,वडगाव( गांजा),फनेपुर,विलासपुर पांढरी,माळेगाव आदी गावाला भेट दिली. यावेळी शिवसेना(UBT) तालुकाप्रमुख अमोल बिराजदार,राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) नरदेव कदम, मा.नगरसेवक शाम नारायणकर,राष्ट्रवादी काँग्रेस लोहारा शहराध्यक्ष नाना पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष शैलेश चंदनशिवे,मा पस सभापती विलास भंडारे,मा. जिप सदस्य गुंडू भुजबळ,रघुवीर घोडके,महेबूब गवंडी,अभिजात लोभे, रौफ बागवान, बाबा जाधव, दिलीप पाटील, आकाश जावळे, प्रेम लांडगे,बळीराम गोरे, दत्ता पाटील,बालाजी माशाळकर,नितीन जाधव, समीर शेख, सचिन गोरे, बालाजी बाबळे, गणेश मत्ते,सुभाष थोरात, ओम पाटील,अंगद मुळे, अतुल सर्वडे, रामलिंग निमशेट्टी,राहुल गर्जे महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.