श्री तुळजाभवानी देवीच्या अभिषेक करवाढीस विरोध ठराव रद्द करण्याची पुजारी मंडळांची मागणी
श्री तुळजाभवानी देवीच्या अभिषेक करवाढीस विरोध ठराव रद्द करण्याची पुजारी मंडळांची मागणी

श्री तुळजाभवानी देवीच्या अभिषेक करवाढीस विरोध
ठराव रद्द करण्याची पुजारी मंडळांची मागणी
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानने अभिषेक कर वाढीचा ठराव घेतला आहे. त्यास पुजारी मंडळाने विरोध केला असून, सोमवारी झालेल्या बैठकीत या पुजारी मंडळांनी हा ठराव रद्द करण्याची एकमुखी मागणी केली आहे.श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या मे महिन्यात झालेल्या विश्वस्त बैठकीत अभिषेक कर हा रुपयांवरून ५०० रुपये करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्यास मंजुरीही मिळाली आहे. दि. १० जुलै रोजीपासून त्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिले होते.
यानंतर शहरातील सर्व माजी नगरसेवकांनी विश्वस्त आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची भेट घेऊन भाविकांना भुर्दंड ठरणारी अभिषेक करवाढ मागे घेण्याची सांगितले होते.पुजारी मंडळांची बैठक याअनुषंगाने सोमवारी प्रशासकिय व्यवस्थापक संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली भोपे पुजारी मंडळ, पाळीकर पुजारी मंडळ व उपाध्ये मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यात तिन्ही पुजारी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी अभिषेक करवाढीस तीव्र विरोध करून तो ठराव रद्द करावा, अशी एकमुखी मागणी केली.यावर जिल्हाधिकारी यांनी या करवाढीला स्थगिती देऊन मंदिरातील तिन्ही पुजारी मंडळाला विश्वासात घेऊन निर्णय घेतला जाईल, असे सांगीतले होते. या निवेदनावर बाळासाहेब भोसले, बाळासाहेब सरवदे, किरण चव्हाण, अमित कुलकर्णी, धिरज जाधव, किशोर गंगणे सह २१ पुजाऱ्याच्या स्वाक्षऱ्या आहेत.
५०० रुपये दरवाढ रद्द करा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानने सर्व सामान्य गोर गरीब जनतेचे नियोजन केले नाही. येणाऱ्या भविक भक्तांचे पुजाऱ्या कडून विना मुल्य सुख सुविधा पुरविल्या जातात मंदिर संस्थान कडून सर्व सामान्य भक्तांना सुविधा पुरविल्या जात नाहीत मंदिर संस्थान कडून धर्मशाळेच्या माध्यमातून , पेड दर्शन नावाखाली भाविकांची लुटमार चालू केली आहे. प्रसाद म्हणून सर्व सामान्य भक्तांना १० रु मध्ये दोन लाडू मिळत होते. तो लाडू देश भरात प्रसिद्ध झाला होता तो लाडू ज्यांनी बंद केला त्यांच्या वर अद्याप कोणतीही पोलिस प्रशासनाने कारवाई केलेली नाही.
किशोर गंगणे , माजी पुजारी मंडळ अध्यक्ष