
लोहारा (प्रतिनिधी)
लोहारा येथील व्यवसायीक संतोष फरीदाबादकर यांनी वडिलांच्या कै.शिवदास फरिदाबादकर यांच्या द्वितीय पुण्यस्मरण निमित्त शहरातील ग्रामीण रुग्णालय आणि हॉस्पिटल लोहारा व श्रीगिरे हॉस्पिटल मध्ये रुग्णांना खाऊआणि फळे वाटप करीत अभिवादन केले.
शहरातील जुने व्यवसायिक कै.शिवदास फरिदाबादकर यांनी शहर व परिसरातील नागरिकांची चांगले जवळचे नाते निर्माण केलेले होते त्यांची ओळख व त्यांचे कार्य असेच स्मरणात राहावं त्यामुळे त्यांची मुले संतोष आणि अमोल फरीदाबादकर यांनी शहरातील रुग्णालयात द्वितीय पुण्यस्मरण निमित्त फळ वाटप केले यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.रवींद्र पापडे,डॉ.गोविद साठे, डॉ.हेमंत श्रीगिरे, डॉ.सौ.रुपाली श्रीगिरे,संतोष फरिदाबादकर,हरी लोखंडे,तुषाल घोटकर,दीपक फरिदाबादकर,राहुल बेळकुणीकर,सद्दाम जमादार,मुज्जमिल शेख,सिराज सिद्धकी,आविनाश नरगाळे,बाबा सुंबेकर,अनिकेत फरिदाबादकर आदी उपस्थित होते .