तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाचा कारभार खाजगी व्यक्तीच्या भरवशावर चौकशीची मागणी
Post-गणेश खबोले

लोहारा (प्रतिनिधी)
लोहारा तहसील कार्यालयामध्ये शासकिय कामासाठी लोकांची नेहमीच ये-जा होते. तसेच तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागामध्ये मुळ कर्मचारी हजर राहत नसून त्यांचे कामे हे खाजगी व्यक्तीच्या हस्ते करून घेत आहेत.त्यामुळे पुरवठा विभाग हा महत्त्वाचा विभाग असून ज्यामध्ये महत्त्वाच्या कागदपत्रे हे खाजगी व्यक्ती हाताळत आहेत.तरी संबंधित खाजगी व्यक्ती कडून महत्त्वाचे शिधापत्रिकासाठी सादर केलेले कागदपत्रांची संचिका गहाळ होणे आदी प्रकार घडत आहेत सदरील कामासाठी गोर-गरीब लोक शिधापत्रिकेची मागणी करत असता संबंधित कर्मचारी अधिकारी तुमचे कागदपत्रे गहाळ झाले आहेत तुम्ही तुमचे दुसरे कागदपत्रे आणून द्या त्याशिवाय तुमचे काम होणार नाही असे सरळ सांगत असल्याने तसेच शासकिय कर्मचाऱ्यांना जे काम नेमूण देण्यात आलेले आहे ते स्वतः कोणतेही कामे न करता ते काम खाजगी व्यक्तीकडे देत आहेत. खाजगी व्यक्ती हे कामकाज विना मोबदला करत नाहीत.व स्वतःची वरची कमाई म्हणून खेडेगावातून येणाऱ्या अशिक्षित लोकांकडून अवाढव्य रक्कम वसूल घेत आहेत. जे लोक पैसे देत नाहीत त्या लोकांना तत्काळत उभे करून त्यांचे कामे न करणे विचारणा केल्यावर त्यांना अरेरावीची उर्मुट भाषेचा वापर करून त्यांना अपमानास्पद वागणूक देने असा प्रकार घडत आहेत.
तरी संबंधीत पुरवठा विभागातील कर्मचारी हे तसेच नविन व दुय्यम शिधापत्रिका मागणी करण्यासाठी
आलेल्या लोकांना अवाजवी रक्कम घेवून त्या गरीब लोकांची आर्थिक पिळवणूक करीत आहेत.लोहारा तालुक्यातील अशिक्षित व गरीब लोकांची आर्थिक व मानसिक पिळवणूक हे कर्मचारी करीत आहेत. तरी याबाबत तहसील कार्यालयामधील पुरवठा विभागाची चौकशी करून त्या विभागात काम करणाऱ्या कर्मचारी व खाजगी लोकांची सखोल चौकशी करून कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी अन्याय अत्याचार विरोधी समिती अल्पसंख्याक विभाग जिल्हा अध्यक्ष सय्यद अजीज फझल यांनी विभागीय आयुक्त संभाजीनगर यांच्याकडे धाराशिव जिल्हाधिकारी मार्फत देण्यात आलेल्या निवेदनात केली आहे