जुगार विरोधी कारवाई दरम्यान उप विभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, कळंब यांची कारवाई

जुगार विरोधी कारवाई दरम्यान उप विभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, कळंब यांची कारवाई
कळंब /न्यूज सिक्सर
उप विभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, कळंब चे सहायक पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांच्या आदेशावरुन कळंब उप विभागाचे पथक अवैध धंद्यांविषयी माहिती काढून कारवाई करण्यासाठी काल दि. 09.04.2023 रोजी उस्मानाबाद शहरात गस्तीस होते. दरम्यान पथकास गोपनीय माहिती मिळाली की, उस्मानाबाद येथील एलआयसी ऑफीसचे बाजूसनगरपालिका कॉम्प्लेक्सचे बाजूला काही इसम जुगार खेळत आहेत. यावर पथकाने नमूद ठिकाणी 16.10 वा. सु. छापा टाकला असता तेथे उस्मानाबाद येथील रहिवाशी – 1.नामदेव नारायण गव्हाणे, 2.मयुर अंकुश पवार, 3.संतोष लिंबा राउत, 4.प्रणव संतोष गव्हाणे, 5.सरुराज मोहम्मद पठाण हे सर्व लोक चक्री मटका जुगार खेळत असताना जुगार साहित्यासह रोख रक्कम असा एकुण 1,09,890 ₹ चा माल बाळगलेले असताना पथकास आढळले. यावर पथकाने जुगार साहित्यासह रक्कम व मोबाईल फोन जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अंतर्गत उस्मानाबाद शहर पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.
सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांच्या आदेशावरुन कळंब उप विभागाचे ए.एस.पी.- श्री. एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि- श्री. पुजरवाड, पोलीस अंमलदार-खांडेकर, भांगे, अंभोरे यांच्या पथकाने केली आहे