ब्रेकिंगमहाराष्ट्र
तहसील कार्यालयासमोर बेमुदत लाक्षणिक उपोषणाचा ९ वा दिवस उपोषण स्थळी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दिली भेट.
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

तहसील कार्यालयासमोर बेमुदत लाक्षणिक उपोषणाचा ९ वा दिवस
उपोषण स्थळी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दिली भेट.
तुळजापूर : प्रतिनिधी
आयुक्त संभाजीनगर यांचा आदेश ,जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने परीत झालेले असताना सुद्धा तुळजापूर तालुक्यातील भातंब्री येथील शेतरस्ते मोकळा करुन देण्यास महसूल प्रशासन व भूमी अभिलेख कार्यालय तुळजापूर हे अपयशी ठरत आहे या मागणीचे निवेदन देवून ग्राहकमंच समिता महाराष्ट्र राज्य यांनी तहसील कार्यालया समोर दि. १२ ऑगस्ट पासून बेमुदत लाक्षणिक उपोषणाचा आज ९ दिवस आहे
दि.२० ऑगस्ट रोजी जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी उपोषण ठिकाणी शिवाजी गोरोबा दांगट त्रस्त शेतकऱ्याचीभेट घेऊन संबंधित विभागाशी चर्चा करून आपल्या शेत रस्त्याचा विषय मार्गी लावू असे शेतकऱ्याला खासदारांनी आश्वासन दिले त्यानंतर तहसील कार्यालय येथे जनता दरबार घेण्यात आला.