
लोहारा-प्रतिनिधी
लोहारा तालुक्यातील कास्ती (खुर्द) येथे दि.१४ एप्रिल रोजी जय बजरंग ग्रुप च्या वतीने आणि वडार समाज बांधवांच्या प्रेरणेतून छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा ज्योतिबा फुले,डॉ बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
या महापुरुषांनी sc,St, आणि obc समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य कसे वाहुन घेतले.समाजासाठी महापुरुषांनी कशाप्रकारे त्यागी जीवन जगले हे समाजाला मार्गदर्शन करताना तिम्मा माने यांनी सांगितले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी उपसरपंच महेश पाटील तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून छत्रपती कामगार संघटनेचे राज्य सचिव तिम्मा माने उपस्थित.यावेळी भिमा पवार,आणाप्पा बंडगर,बालाजी धोत्रे,सुनिल बंडगर,राम चव्हाण,बाळासाहेब सगट,तुकाराम बंडगर आणि महिला व सर्व वडार समाज बांधव उपस्थित होते.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जय बजरंग ग्रुपचे सर्व सभासदांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अमोल धोत्रे यांनी केले तर आभार प्रदर्शन पांडुरंग चव्हाण केले.