तुळजापूर शहरात दोन दिवसाआड पाणी पुरवठा होणार – नगर प्रशासन
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

तुळजापूर शहरात दोन दिवसाआड पाणी पुरवठा होणार – नगर प्रशासन
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
या वर्षी धाराशिव जिल्ह्यात, तुळजापूर तालुक्यात व तुळजापूर शहरात कमी प्रमाणात झालेल्या पर्जन्यमानामुळे तुळजापूर शहराला पाणी पुरवठा करणाया बोरी धरणात / कुरनूर प्रकल्पात उपलब्ध पाणी ९ दलघमी इतके आहे.
उपलब्ध पाणीसाठा जून – २०२४ पर्यत जपून वापरणे आवश्यक असून त्याकरिता पाण्याचे योग्य नियोजन होणे आवश्यक आहे. करिता उपलब्ध पाणीसाठा जास्तीत जास्त दिवस वापरणे आवश्यक असल्याने नियोजनाचा भाग म्हणून दि.२०/११/२०२३ रोजी शहरातील मंगळवार पेठ या भागात पाणीपुरवठा होणार आहे. त्या दिवसापासून म्हणजे दि.२०/११/२०२३ नंतर दोन दिवसांनी म्हणजे शुक्रवार पेठ या भागात दि.२३/११/२०२३ रोजी पाणी पुरवठा करण्यात येईल व त्यानंतर संपूर्ण शहरात जुन्या पद्धतीने फक्त एक दिवसाआड ऐवजी दोन दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येत आहे.
उपलब्ध पाणी साठा जून – २०२४ पर्यत पुरविणे करिता या पुढील कालावधीत शहरामध्ये एक दिवसाआड ऐवजी दोन दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. तरी उपलब्ध पाणी जपून वापरून आलेल्या नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी उपलब्ध पाणी जपून वापरावे नागरिकांनी प्रशासनामार्फत आव्हान करण्यात येत आहे.