न्यूज सिक्सर मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

तहसील कार्यालय रिक्त पदे भरण्याची संभाजी ब्रिगेड ची मागणी

Post-गणेश खबोले

पुरवठा विभाग तहसील कार्यालय लोहारा येथे उपस्थित २ अधिकारी आहेत व तसेच ६ कर्मचारी संख्या रिक्त पदे वाढवीणे मागणी

लोहारा -प्रतिनिधी­

लोहारा तालुका हे 1998 साली झाले तालुका निर्मितीनंतर अनेक शासकीय कार्यालय कार्यान्वित झाले परंतु आजही लोहारा तहसील कार्यालयामध्ये अनेक पदे रिक्त असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे यासाठी तात्काळ तहसील कार्यालयातील रिक्त पदे भरण्यात यावे अन्यथा लोहारा तालुका संभाजी ब्रिगेड च्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
लोहारा हा ग्रामीण भागातील मागासलेला तालुका आहे या तालुक्यामध्ये शेतकरी वर्गांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. शासनाच्या अनेक योजना प्रकल्प मोहिम राबवले जातात. राशन पुरवठा विभाग अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे व अनेक पदे रिक्त असल्यामुळे कामानिमित्त आलेल्या नागरिकांची शालेय विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.
राशन विभागाचा कर्मचारी संख्या कमी असल्यामुळे सुट्टी दिवशी देखील कार्यालयात बसुन कर्मचार्‍यांना प्रलंबित कामे व शासनाला उपयोगी असणारी माहिती द्यावी लागते.
नागरिकांना छोट्या मोठ्या कामासाठी अनेकदा तहसील कार्यालयाच्या दैनंदिन चकरा मारत उंबरठे झिजवावे लागत आहे.
तसेच तहसील कार्यालयातील सर्व कामकाज हे ऑनलाईन पद्धतीने चालु असल्यामुळे इंटरनेटची कमतरता लाईटची कमतरता भासत असल्यामुळे कामांमध्ये अनेक प्रकरणे पेडिंगमधे असून याचा फटका नागरिकांना सोसावा लागत
असल्यामुळे तात्काळ रिक्त पदे भरण्यात यावे. तसेच लोहारा तहसील कार्यालयातील रिक्त पुरवठा निरक्षक. शिपाई, सह आदी रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावे अन्यथा लोकशाही पद्धतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
तसेच लोहारा तहसील कार्यालयातील तात्काळ रिक्त पदे भरण्यात न आल्यास 30 जुलै पासून आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुद्दत आमरण उपोषण करण्यात येईल याची शासनाने तात्काळ दखल घ्यावी अन्यथा होणाऱ्या परिणामास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील. संभाजी ब्रिगेड लोहारा तालुका प्रमुख शिवश्री बालाजी भागवत यादव संभाजी ब्रिगेड वाहतूक आघाडी तालुकाध्यक्ष शिवश्री शरद जावळे प्रितम जावळे निवेदनावर आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे