
लोहारा-प्रतिनिधी
लोहारा तालुक्यातील जेवळी (उ) येथील डेंग्यू सदृश्य आजाराने सोलापूर येथे उपचार घेत असलेल्या सात महिन्याच्या बालकाचा सोमवारी (दि.१) उपचारा दरम्यान मृत्यू झाला असून सध्या परिसरात तीव्र ताप व उलट्या,जुलाबाचे लक्षणे असलेल्या रुग्णानांच्या संख्येत वाढ झाल्याने नागरीकांत चिंता व्यक्त होत आहे.
जेवळी येथे अस्वच्छता, दमट व ढगाळ वातावरणामुळे तीव्र ताप, उलट्या व जुलाबाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले असून यात बालकाचे प्रमाण जास्त आहे. येथील शिवतेज मनोज ढोबळे (वय सात महिने) हा बालक गेल्या तीन दिवसांपासून आजारी होता. जेवळी व लोहारा येथील खाजगीर रुग्णालयात उपचार घेत होता. परंतु तीव्र ताप, उलट्या जुलाबने प्रकृत नाजूक बनल्याने पुढील उपचारासाठी सोलापूर येथील येथील खाजगीलो रुग्णालयात दाखल करण्यात आले तपासणीनंतर येथे डेंगूचा प्रादुर्भाव झाल्याचे सांगण्यात आले. बालकाला अतिदक्षता विभागात दाखल करून उपचार चालू ठेवला होता. प्रकृती सुधारण्यासाठी चोवीस तासाची मुदत दिली होती परंतु प्लेटलेट झपाट्याने कमी होत सोमवारी (दि.१) पहाटे दोनच्या सुमारास उपचारा दरम्यान त्या बालकाचा मृत्यू झाला आहे. सध्या परिसरात तीव्र ताप व उलट्या,जुलाबाचे लक्षणे असलेल्या रुग्णानांच्या संख्येत वाढ झाल्याने नागरीकांत चिंता व्यक्त होत आहे. यासाठी ग्रामपंचायतीने स्वच्छतेची मोहीम हाती घ्यावी व आरोग्य विभागाने रुग्णसर्वे व प्रतिबंधात्मक उपाय योजना सुरू अशी मागणी नागरिकांतन होत आहे
बहुतांश रुग्ण खाजगीत उपचार घेत असल्याने या बाबत फारशी माहिती मिळाली नाही. याबाबत माहिती घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येईल
डॉ गणेश मुंडे,
वैद्यकीय अधिकारी,प्राथमिक आरोग्य केंद्र जेवळी