तुळजापूर तालुक्याती आपसिंगा येथील नरेंद्र आर्य विद्यालयत
भारतीय स्वातंत्र्यदिन समारोह

तुळजापूर तालुक्याती आपसिंगा येथील नरेंद्र आर्य विद्यालयत
भारतीय स्वातंत्र्यदिन समारोह
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर तालुक्याती आपसिंगा येथील मंगळवार दिनांक १५ ऑगस्ट रोजी नरेंद्र आर्य विद्यालय, येथे विद्यालयाच्या प्रांगणात नरेंद्र आर्य शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव शंकरजी रामहरी गोरे यांच्या शुभ हस्ते व संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव सांजेकर ,इतर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला.
शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये घेण्यात आलेल्या विविध परीक्षेत,विविध विभागामार्फतच्या स्पर्धा यात यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा विविध संस्था,संघटना तसेच मान्यवरांनी ठेवलेल्या रोख रक्कम ₹20500/- व ₹23800/- चे शैक्षणिक साहित्य देऊन उपस्थित सर्व पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
विद्यालयाचे माजी विद्यार्थी व सध्या महाड तालुका मध्ये तलाठी पदावर कार्यरत असलेले गोरोबा काशिनाथ तोडकरी यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून व विद्यालयाचे ऋण व्यक्त करत 200 पेजेसच्या 570 वह्या(रजिस्टर),तितक्याच पेन दिलेल्या होत्या.तसेच विद्यालयाचे सेवानिवृत्त सेवक बाळासाहेब नानासाहेब सरडे यांनी 5 वी ते 10 वी वर्गातील प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी रजिस्टर,पेन व कंपास देऊ केले होते व त्यांनी विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप ही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यानिमित्ताने काशिनाथ तोडकरी व बाळासाहेब सरडे यांचा पुष्पगुच्छ (बुके) देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.