मासुर्डी ता. औसा येथील युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

मासुर्डी ता. औसा येथील युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
तुळजापूर : प्रतिनिधी
एका ३८ वर्षाच्या युवकानी घरात भाडण करून पुणेला जातोय असे सांगून घरातून निघून गेला आणि तुळजापूर शहरातील लातूर रस्त्यानजिक तडवळा चौक परिसरातील शेतात गणेश दिनकर यादव (वय ३८ वर्ष, रा. मासुर्डी ता. औसा) व्यवासय नाव्ही यांनी साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या पच्छात आई- वडील, पत्नी , मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
शेतातील लिंबाच्या झाडास युवकाने गळफास घेवून आत्महत्या केली. ही दूर्घटना तुळजापूर शिवारात मंगळवारी (दि.११) दुपारी निदर्शनास आली. याप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,
मंगळवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास ही घटना निदर्शनास आली. या प्रकरणी तडवळा येथील पोलीस पाटील गुरुनाथ मस्के यांनी दिलेल्या माहितीवरून तुळजापूर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक धनुरे हे करीत आहेत.