
उमरगा/पेठ सांगवी(लक्ष्मण कांबळे)
धाराशिव जिल्हा परिषद माजी बांधकाम व अर्थ सभापती गोविंद भाऊ सदाशिवराव पवार यांचा 75 वा अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.दि.3 फेब्रुवारी रोजी श्री शरदचंद्रजी पवार वरिष्ठ महाविद्यालय,नारंगवाडी येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे आयोजन समाजसेवा शिक्षण संस्थेचे सचिव दिलीप सदाशिवराव पवार आणि राम लिंगेश्वर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा भूकंपग्रस्त शाळा व महाविद्यालय कृती समितीचे अध्यक्ष दीपक पवार हे होते. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मा. राज्यमंत्री बसवराज पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून तुळजापूर विधानसभा आ. राणाजगजीतसिंह पाटील,मराठवाडा शिक्षक मतदारसंघ आ.विक्रम काळे,उमरगा-लोहारा विधानसभा आ प्रवीण स्वामी,औसा विधानसभा आ.अभिमन्यू पवार,आ.मारुतीजी मुळे (कर्नाटक), आ. शरणुजीजी सलगर(बस्वकल्याण) हे उपस्थित होते.
यावेळी माजी सभापती गोविंद पवार यांचा ग्रंथ तुला करण्यात आली.रक्तदान,वृक्षारोपण इत्यादी कार्यक्रमाचे ही आयोजन करण्यात आले होते.यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष संताजी चालुके, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष सुरेश दाजी बिराजदार,शिवसेना(उबाठा) नेते बाबा पाटील,अभय चालुक्य ,सुनील माने,कैलास शिंदे,अशोकराव जवळगे,शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन पनूरे,पद्माकर हळकर,राहुल पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री शरचंदाजी पवार वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य अजिंक्य पवार यांनी केले तर सूत्रसंचालन प्राध्यापक डॉ.विनायक काळकुटे यांनी मांडले. तर उपस्थितांचे आभार किशोर पांचाळ यांनी मानले.